Maharashtra Congress Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Congress : काँग्रेसच्या युवा नेत्यांची प्रदेशाध्यक्षपदाकडे पाठ

Congress Leadership : विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक पराभवानंतर काँग्रेसला पुनरुत्थानासाठी तरुण आणि ऊर्जावान नेत्याच्या शोधात पक्षश्रेष्ठी आहेत. मात्र तरुण नेत्यांनी अडचणीच्या काळात पाठ फिरवली आहे.

दीपा कदम

मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक नीचांकी जागांवर घसरलेल्या काँग्रेसला पुन्हा एकदा जीवदान देण्यासाठी तरुण आणि उत्साही प्रदेशाध्यक्षाच्या शोधात पक्षश्रेष्ठी होते. मात्र तरुण नेत्यांनी अडचणीच्या काळात पक्षाच्या मागे उभे राहण्याचे सोडून पाठ फिरवली आहे.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रथम प्राधान्याने काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना प्रदेशाध्यक्षपद स्वीकाराण्याची सूचना केली होती. मात्र त्यांनी असमर्थतता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आमदार अमित देशमुख यांनीही प्रदेशाध्यक्षपद इतक्यात नको, अशी भूमिका घेत हात वर केले आहेत.

प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या इच्छुक नसल्याचे या दोघांनीही पक्षप्रश्रेष्ठींना स्पष्टपणे कळविल्याने काँग्रेसची भलतीच कोंडी झाली आहे. तिसरा पर्याय म्हणून विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या यशोमती ठाकूर आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रदेशाध्यक्षपदासाठी चाचपणी सुरू झाल्याचे समजते.

विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे. मात्र तो अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. पटोले यांचा राजीनामा स्वीकारण्यापूर्वी नवीन प्रदेशाध्यक्ष निश्चित करणे आवश्यक असल्याने काँग्रेस नवीन प्रदेशाध्यक्षाच्या शोधात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : मोदींचा मोठा संकल्प; स्वावलंबी भारतासाठी देशाला दिला खास संदेश

ASIA CUP 2026: जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

SCROLL FOR NEXT