nana patole  esakal
महाराष्ट्र बातम्या

'राष्ट्रवादी-शिवसेनेने युतीची घोषणा करावी, त्यांना शुभेच्छा'

भाग्यश्री राऊत

मुंबई : काँग्रेसने (congress) सर्वात जास्त महाराष्ट्रात काम केलं. कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता ऑक्सिजनपासून प्लाझ्मापर्यंत सर्वच सोयी पुरविल्या. राहिली पक्षाची भूमिका आहे, तर सेनेनी देखील आम्ही स्वबळावर लढू, अशी मांडली. भाजपने देखील हीच भूमिका मांडली होती. आता आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कोणाला त्रास का व्हावा? असा टोला नाना पटोले यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. राष्ट्रवादी अन् सेनेने युती करून जाहीर करावे. त्यांना युतीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी लवकर युती जाहीर करावी, असेही ते म्हणाले. (congress state president nana patole criticized shivsena and ncp)

प्रताप सरनाईकांना लेटर बॉम्ब फोडला आहे. ते दोन पक्षाचे प्रकरण आहे. पत्रामध्ये सरनाईकांनी सांगितले, की केंद्रीय तपास यंत्रणेच्या त्रासामुळे ते सर्व करत आहे. आमची भूमिका भाजप केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून सेनेला राष्ट्रवादीला त्रास देत आहे. त्याचा गैरवापर करत आहे, असे त्यांनी लिहिले आहे. बाळासाहेबांनी भाजपला बोट धरून महाराष्ट्रात मोठे केले आहे. त्यांचाच मुलगा आज राज्याचा मुख्यमंत्री असताना त्यांची खुर्ची काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे निषेधार्त आहे.

भाजपच्या नेत्यांनाही केंद्रामधून त्रास होत आहे. त्यांना केंद्रामधून जे सांगितले जाते तेच ते बोलतात. अनेक खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना त्रास आहे. अनेक खासदारांनी आत्महत्या करायला सुरुवात केली आहे, असेही गंभीर विधान नाना पटोले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT