Nana Patole vs Dhananjay Munde
Nana Patole vs Dhananjay Munde esakal
महाराष्ट्र

'महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार'; मुंडेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले पटोले?

सकाळ डिजिटल टीम

'ईडीनं गांधी कुटुंबीयांना हात लावल्यास जेलभरो आंदोलन करू.'

राज्यात पाच वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर असलेल्या 51 जणांनी राजीनामा दिलाय; पण आता आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळं या काळात नवीन अध्यक्ष नेमायचा का की, निवडणुकीपर्यंत यांना कायम ठेवायचं? याबाबत हायकमांडशी चर्चा करणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितलं.

नाना पटोले म्हणाले, केंद्र सरकार (Central Government) अपयशी ठरलं असून देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढलीय. या भाजप सरकारनं शेतकऱ्यांना बरबाद केलंय. भाजपचं केंद्र सरकार सर्व आघाडींवर अपयशी ठरलंय, त्यामुळंच भाजप गांधी कुटुंबीयांना लक्ष्य करत आहे. तसेच ईडीनं गांधी कुटुंबीयांना हात लावल्यास जेलभरो आंदोलन करू, असा इशारा पटोलेंनी दिलाय.

भाजप 2014 आणि 2019 च्या निवडणुकीतपासून गांधी कुटुंबाला (Gandhi Family) लक्ष्य करत आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी भाजपकडून गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं जात आहे. ज्या दिवशी तपास यंत्रणा गांधी कुटुंबाला ताब्यात देईल, त्या दिवशी संपूर्ण देश जेलभरो आंदोलन करेल. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले होते, की महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) असेल. यावर नाना पटोले म्हणाले की, प्रत्येकाला आस ठेवली पाहिजे, लोकशाहीत पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. काहींना दिवसाही स्वप्न पडतात, यावर काही बोलणार नाही असंही पटोले म्हणाले.

कोरोना आला तर निवडणूक आयोग त्याबाबत निर्णय घेऊ शकतो. निवडणुकीचा कालावधी ठरलेला नाहीय, एखादी नैसर्गिक आपत्ती आली असेल तर निवडणुका मागे-पुढे करण्याचा पूर्ण अधिकार आयोगाला आहे. तसेच ओबीसींचा इम्पेरीकल डाटा गोळा करण्याला वेग आला आहे, काँग्रेस याचा सातत्यानं पाठपुरावा करत आहे. जातिनिहाय जणगणनेसाठी 500 कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे, वेळ आली तर विकास कामे बाजूला ठेवा आणि जातिनिहाय जनगणना करावी, अशी भूमिकाही पटोलेंनी मांडलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT