Sharad Pawar- Soniya Gandhi. e sakal
महाराष्ट्र बातम्या

भाजपाविरोधी आघाडीमध्ये काँग्रेस असेल का? शरद पवार म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) या महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. तसेच ममता बॅनर्जी भाजपविरोधातील आघाडीमधून काँग्रेसला वगळण्याच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच ममतांनी राहुल गांधींवर देखील टीका केली होती. त्यामुळे तिसऱ्या आघाडीमध्ये काँग्रेसला (Congress) घेणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाच आता ममतांसोबत झालेल्या बैठकीनंतर शरद पवारांनी उत्तर दिले आहे.

विदेशात राहून राजकारण कसं होईल? असं ममता बॅनर्जी राहुल गांधींवर टीका करताना म्हणाल्या होत्या. तसेच त्यांची काँग्रेसविरोधी देखील भूमिका दिसली. त्या तिसऱ्या आघाडीमधून काँग्रेस वगळतील की काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. यावरूनच आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाशिवाय भाजपला आव्हान देण्याचा पर्याय उपलब्ध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजपविरोधी असलेल्या कोणालाही एकत्र यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे. आमच्यासाठी नेतृत्व हा मुद्दा नसून सक्षम पर्याय उभा करणे हा महत्वाचा मुद्दा आहे. सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे. ज्यांची मेहनत करायची तयारी आहे, सर्वांसोबत काम करायची तयारी आहे त्यांना आघाडीमध्ये सोबत घेऊन जायचं आहे'', असं पवार म्हणाले.

आज राष्ट्रीय पातळीवर सारखे विचार असलेल्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येऊन नव्या नेतृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला पाहिजे. सर्वांनी मिळून भाजपला सक्षम पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. येत्या २०२४ च्या निवडणुकांमध्ये हा पर्याय तयार व्हायला हवा. त्यासाठीच आज ममता बॅनर्जीसोबत चर्चा केली असल्याचेही पवारांनी सांगितले. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊतांची देखील उपस्थिती होती. या बैठकीमध्ये महत्वाची राजकीय चर्चा झाली असल्याचे राऊतांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT