Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांच्या शब्दाला काँग्रेसने डावललं?

महाविकास आघाडीला धक्का! काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे मोठं वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

राज्याचं राजकारण तापलेलं असतानाच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेस स्वबळावर निवडून येऊ शकतो अशी स्थिती महाराष्ट्रात आहे, असं वक्तव्य करुन प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. काही दिवसापूर्वी आगामी निवडणुका एकत्र लढण्यासंदर्भात कोणतीही अडचण नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हंटलं होतं.

दरम्यान नाना पटोले यांनी पुन्हा स्वबळाची भाषा करत आम्ही जनतेच्या अपेक्षेत खरे उतरु, असे ते म्हणाले आहेत. पटोले यांच्या या विधानामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मराठवाडा, विदर्भासह कोकणामध्येही काँग्रेसचा आमदार निवडून येऊ शकतो, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

हे ही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

पवारांसारखे जे काँग्रेस सोडून गेले त्यांनाही आता काँग्रेस संपणार नाही, असं वाटत आहे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीची चर्चा बैठकीत होईल. अमरावती आणि नागपूरची जागा महविकास आघाडी शिक्षण मतदार संघात लढवणार आहोत. आमची तयारी सुरु आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.

आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवू असं राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होत. 2024 मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट एकत्र तयारी करत आहेत, असं पवार म्हणाले होते. पण आता पटोले यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Farmers: दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा, ई- फेरफार पीक पाहणीला मुदतवाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

माझा भाऊ गेला, त्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चेला फुल स्टॉप; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

Latest Marathi News Live Update: बुलढाणा- जळगावला भूकंपाचे हादरे

Gokul Annual General Meeting 2026 Date : 'गोकुळ'ची सर्वसाधारण सभाही गाजणार; न झालेली सभा 30 नोव्हेंबरपूर्वी घ्यावी लागणार, 25 रोजी न्यायालयात सुनावणी

NVIDIA CEO: जगातील सर्वात मोठ्या चिप कंपनीच्या CEO पदासाठी 3 भारतीयांची नावं चर्चेत! कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT