Chandrakant Patil, Nana Patole Sakal
महाराष्ट्र बातम्या

MLC Election 2022: मविआची एक विकेट पडणार; चंद्रकांत पाटलांचा दावा

काँग्रेसच्या तीन पैकी एका जागेवर पराभव होणार असल्याचा दावा चंद्रकांच पाटलांनी केला आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुका दोन दिवसांवर आल्या असून तब्बल १० उमेदवारांसाठी २० जूनला मतदान होणार आहे. यासाठी महाविकासआघाडीचे सहा तर भाजपचे पाच उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभेला अपक्ष आमदारांची मतासाठी फाटाफुट झाली होती. तशी अवस्था परत होऊ नये यासाठी सर्व पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान नाना पटोले यांच्याकडून पराभवाच्या कारणांची स्क्रिप्ट बनवली जात असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

(Chandrakant Patil On Nana Patole)

दरम्यान नाना पटोले यांनी माध्यमांना बोलताना आमच्या आमदारांना धमकावण्याचे फोन येत आहेत. हे फोन ईडीकडून येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या मुद्दा खोडून काढत त्यांच्या एका उमेदवाराचा पराभव होणार असल्याचं सांगितलं आहे. एका उमेदवाराचा पराभव झाल्यावर दिल्या जाणाऱ्या कारणांची स्क्रिप्ट ते बनवत असल्याचा आरोप त्यांनी पटोले यांच्यावर केला आहे. महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव होणार असल्याचा दावा त्यांनी माध्यमांना बोलताना केला आहे.

दरम्यान राज्यसभेच्या निवडणुकांच्या वेळी जसा चमत्कार झाला तसाच चमत्कार विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी होणार आहे. त्यासाठी सगळी रणनिती ठरवली गेली आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. मताचा कोटा जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच मत बाद होणार नाहीत याची काळजी घेतली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

काँग्रेसचे दोन, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन तर भाजपचे पाच उमेदवार रिंगणात आहेत. विधानपरिषदेची ही चुरस काँग्रेस आणि भाजपमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण दोन्ही पक्षांना आपला शेवटचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. तर भाजप आपल्या पाचही जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला आहे. महाविकास आघाडीची एक विकेट पडणार असं ते म्हणाले आहेत. तर काँग्रेसकडून होत असलेल्या आरोपावर प्रत्युत्तर देताना ते पराभवाचे कारणं देण्यासाठी स्क्रिप्ट बनवत आहेत असा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT