Contractor fined 20 lakh 35 thousand rupees for cutting down 36 trees illegally in nashik 
महाराष्ट्र बातम्या

36 झाडांची अवैध कत्तल, नाशिकमध्ये ठेकेदाराला 20 लाखांचा दंड

विनोद बेदरकर

नाशिक - नाशिक रोडला (Nashik Road) ३६ वृक्षांच्या अवैध कत्तलीबाबत ठेकेदाराला महापालिकेने सुमारे २० लाख ३५ हजाराचा दंडाची नोटीस बजावली आहे. दरम्यान ज्या शिवसेनेच्या (Shivsena) नगरसेवकाच्या सांगण्यावरुन ही वृक्षतोड झाली त्याच्यावर त्यांच्या पर्यावरण मंत्र्याचा पक्षादेश धाब्यावर बसविला म्हणून कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमीनी केली आहे.

नाशिक रोड विभागातील वडनेर - विहीतगाव प्रभागातील वडनेर गेट भागात मागील आठवड्यात शनिवारी (ता.८) दुपारी वृक्षतोड होत असतांना स्थानीक नागरिकांनी ही बाब पर्यावरणप्रेमी व नाशिक कृती समितीच्या अश्वीनी भट, वैभव देशमुख यांच्यासह पाच सहा पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाउन संबधितांना परवानगी विषयी विचारणा केली मात्र संबधित कर्मचारी व ठेकेदारांनी उडवाउडवीची उत्तर देत, प्रभागाच्या नगरसेवकांना फोन करुन वृक्षतोड सुरु ठेवली त्यात, या भागातील सुमारे ३६ वृक्षांची कत्तल केली. त्यानंतर नगरसेवकाच्या सांगण्यावरुन स्मशानभूमीच्या ठेकेदारांपर्यत ही लाकड पोहोचली असा हा प्रकार आहे.

प्रतिबंधीत वृक्षांची कत्तल मुंबई-आग्रा महामार्गाच्या रुंदीकरणात (Mumbai Agra Highway) वट वृक्ष कत्तलीवरुन दाखल जनहित याचिकेत नाशिकला वड, पिंपळ उंबरासह काही झाडांच्या प्रजाती तोडण्यावर निर्बंधाचा आदेश झाला त्याची महापालिका कार्यक्षेत्रात अंमलबजावणीचे आदेश असतांना शहरात मात्र सर्रास अवैध वृक्षतोड होत असल्याच्या तक्रारी होतात. दरम्यान वडनेर येथील प्रकाराबाबत तक्रारदार आश्विनी भट व वैभव देशमुख यांनी उपनगर पोलिसात तक्रार करीत, या प्रकाराला वाचा फोडली त्यानुसार पंचनामा होउन संबधित वृक्ष तोड करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जबाबात त्यांनी थेट नगरसेवक केशव पोरजे यांचे नाव घेतल्याची देशमुख यांनी सांगितले. त्यानुसार, बरीच खळखळ करीत अखेर महापालिकेने आज संबधित ठेकेदाराला सुमारे २० लाख ३५ हजाराचा दंडाची नोटीस बजावली.

एका बाजूला शिवसेनेचे पर्यावरण मंत्री पन्नास वर्षाहून आधीक वयाचे वृक्ष जगविण्यासाठी त्यांना हेरिटेज वृक्षाचा दर्जा दिला आहे. तर त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक मात्र बिनदिक्कत वृक्षतोडीला प्रोत्साहान देत असतील. तर तो वनकायदे, महापालिकेचे पर्यावरण आणि त्यांच्या पक्ष नेत्यांचे आदेश धाब्यावर बसविण्याचे प्रकार आहे. त्यामुळे आदेश धाब्यावर बसविणाऱ्या सन्माननीय नगरसेवकांवर कारवाई व्हावी. - वैभव देशमुख (पर्यावरण प्रेमी, कर्तव्शील सामाजिक संस्था)

तोडलेले झाड वृक्षाचे वय मूल्यांकन

भेंडी २ ४२ ते ४४ १३७, ५००

मोहगणी १ ३० ते ३२ ५०.०००

अशोका ९ ३० ते ३२ ४,६२५००

पिंपळ १ २८ ते ३० ६०,०००

कटुलिंब १ २६ ते २८ ५००००

आंबा ३ २६ ते २८ १,८७, ५००

फणस १ ३३ ते ३५ ५०,०००

सिताफळ ३ ७ ते ८ ५३७५०

गुलमोहर ५ ३८ ते ४० ३,६८,७५०

शेवगा १ १० ते १२ ३७५००

विलायती चिंच ३ ३० ते ३२ १,७५,५००

काटेरी बाभूळ १ ३० ते ३२ ३७५००

काशीद १ ४० ते ४२ ८७५००

कायझेलिया पिनाटा १ ४० ते ४२ ८७,५००

पेरु १ ७ ते ८ १२५००

पिंपळ १ ५२ ते ५५ १ लाख

कडूलिंब १ ५२ ते ५५ ८७५००

-----

एकुण ३६ २० लाख ३५ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : कोकणात अडकलेला मान्सून पुढे सरकणार, पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाकडून अपडेट जारी

Plastic Waste Drive: उरुळी कांचनमध्ये ‘माझे प्लास्टिक – माझी जबाबदारी’ संकल्पनेतून प्लास्टिक बँक; १ किलो प्लास्टिकच्या बदल्यात महिलांना साखर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

IND vs AFG, ODI: रोहित शर्मा रनआऊट झाल्यानंतर नक्की काय म्हणाला? शुभमन गिलनेच केला खुलासा

Illegal Pistol Seized: इंदापूरमध्ये अवैध गावठी पिस्तूलासह युवक अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT