Shiv Sena Bjp Alliance 
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena Bjp Alliance: "शिंदेच्या बलिदानामुळे भाजप सत्तेत..." बच्चू कडू भडकले, सेनेच्या आमदारांनी थेट काढली औकात

Sandip Kapde

Shiv Sena Bjp Alliance : भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ठिणगी पडल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे देखील नाराज होते. त्यांनी राजीनामा देणार असल्याचे वक्तव्य देखील केले होते. दरम्याम आमदार बच्चू कडू यांनी भाजपला खडसावले आहे.

बच्चू कडू म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या उठामुळे भाजप सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेनेची कदर करा. भाजप आमदारांकडून शिवसेनेला त्रास देण्याचे काम होत आहे.

४० आमदारांच्या मतदार संघात त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. खालचे जे निवडक लोक आहेत त्यांच्यकडून होणारा त्रास थांबला पाहीजे. एकनाथ शिंदे यांच्या बलिदानामुळे भाजप सत्तेत आहे. त्यामुळे कदर केली पाहीजे. अजून ५ वर्ष उद्धव ठाकरे यांचे सरकार असते तर भाजपचे आमदार १०० आमदार ५०-६० वर आले असते, असे बच्चू कडू म्हणाले.  

शिवसेनेच्या जाहिरातीवरुन देखील युतीत मोठा गोंधळ सुरू आहे. शिवसेनेच्या जाहिरातीत देवेंद्र फडणवीसांना स्थान नव्हते. त्यामुळे भाजपच्या गोटात नाराजीचे वातावरण आहे. खासदार अनिल बोंडे यांनी तर एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, असे बोंडे म्हणाले त्यामुळे युतीत मोठा राडा होणार असल्याची शक्यता आहे.

अनिल बोंडे म्हणाले, बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनणार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे. मात्र त्यांचे सल्लागार चुकीचे सल्ले देत असतील. कारण ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही आहे. उद्धव ठाकरेंना वाटत होत मुंबई म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे. आता शिंदेंना वाटायला लागल ठाणे म्हणजे महाराष्ट्र आहे.

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, एकनाथ शिंदे यांना बेडकाची उपमा देताना विचार केला पाहिजे. अनिल बोंडे किती मोठे होते. ते कुणाचे बोट ठेऊन मोठे झाले, याचा विचार करावा. बाळासाहेंबामुळे ते मोठे झाले नाहीतर महाराष्ट्रात त्यांची औकात नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT