महाराष्ट्र बातम्या

एकट्यामुळे संपूर्ण क्रूझ वेठीला; 'कोरोना रिपोर्ट आल्याशिवाय खाली उतरायचं नाही'

सकाळ डिजिटल टीम

ओमिक्रॉनचं सावट गडद झाल्यापासून राज्यात पुन्हा एकदा रुग्णवाढीचा सिलसिला सुरु झाला आहे. आज देखील रुग्णसंख्येमध्ये (Corona Report) मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे. राज्यात आज तब्बल ५० रुग्ण ओमिक्रॉनबाधित (Omicron) सापडले आहेत. त्यातील ३६ रुग्ण हे एकट्या पुण्यातले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक अशी बातमी समोर येत आहे, जी ऐकून तुम्ही हैराण व्हाल. मुंबईहून गोव्याला निघालेल्या कॉर्डेलिया एम्प्रेस क्रूझच्या एका क्रू सदस्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या एका सदस्यापायी आता सगळ्या प्रवाशांना थांबावं लागणार आहे.

या क्रूझमध्ये एकूण 2017 लोक होते. एक प्रवासी पॉझिटीव्ह आल्यामुळे आता उर्वरित 2016 लोकांची RT-PCR चाचणी करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानंतरच त्यांना क्रूझमधून उतरण्याची परवानगी दिली जाणार आहे. सध्यातरी पॉझिटिव्ह आलेल्या क्रू मेंबरला SOPs नुसार सुविधेत हलवण्यात आले आहे.

ही क्रूझ सध्या मुरगाव बंदरात आहे. आरटीपीसीआर चाचणीशिवाय कोणीही जहाजातून उतरू नये, अशा कडक सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. या लोकांच्या चाचण्या घेण्यासाठी एक वैद्यकीय पथक पीपीई किटसह जहाजावर गेले होते. या जहाजात सुमारे 2000 प्रवासी आणि 13 क्रू मेंबर्स आहेत. एका सदस्यापायी सगळेच सध्या क्रूझवर अडकून आहे.

दरम्यान, आज २,०६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१२,६१० करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२१% एवढे झाले आहे. आज दिवसभरात ५० ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील ३६ रुग्ण हे पुणे शहरातील आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ५१० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT