School
School 
महाराष्ट्र

कमी होणार शाळेची वेळ! विज्ञान, गणित, इंग्रजी विषयांवर राहणार भर

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील शाळा १३ जूनपासून सुरू होणार आहेत. तत्पूर्वी, राज्यातील मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पालकांची चिंता वाढली आहे. शाळा बंद केल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शाळा बंद न ठेवता १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे. तर पावसाळ्याचे दिवस आणि कोरोनावाढीमुळे शाळेची वेळ कमी करून विज्ञान, गणित व इंग्रजी या विषयांवरच सर्वाधिक फोकस केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कोरोनामुळे मार्च २०२० पासून राज्यातील शाळा विशेषत: पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा बंदच राहिल्या. कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये शाळा उघडल्या, पण मेनंतर पुन्हा सुट्ट्यांमुळे शाळा बंद झाल्या. आता १३ जूनपासून शाळा सुरू करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे नियोजन आहे. तत्पूर्वी, कोरोनावाढीचा वेग आणि त्याचा संभाव्य धोका, याचा विचार केला जाणार आहे. कोरोना काळात शाळा बंद राहिल्याने मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. पण, ज्यांच्याकडे ॲन्ड्राइड मोबाईल होते, त्यांनाच त्यात सहभागी होता आले. ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक मुलांना डोळे व कानाच्या आजाराला सामोरे जावे लागले. त्यामुळे शेवटी शेवटी अनेक पालकांनी मुलांचे ऑनलाइन शिक्षण स्वत:हूनच बंद करून टाकले. तर ज्यांच्याकडे मोबाईल नव्हते, त्यांच्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ‘पारावरील शाळा’ हा ऐतिहासिक उपक्रम राबविला. मात्र, दोन वर्षांपासून शाळा बंद राहिल्याने पहिली ते तिसरीतील मुलांच्या गुणवत्तेचा विषय चिंताजनक बनला आहे. त्यामुळे शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरूच राहतील, पण त्यासाठी मुलांच्या पालकांनी व १२ वर्षांवरील त्यांच्या मुलांनी कोरोनावरील प्रतिबंधित लस घेणे गरजेचे आहे, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आरोग्याला प्राधान्य दिले जाईल

सोलापूर शहर-जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, बहुतेक तालुके कोरोनामुक्त आहेत. त्यामुळे शाळा १३ जूनपासून सुरू होतील. पण, शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याच्या आरोग्याला प्राधान्य दिले जाईल. पालकांनीही त्याची खबरदारी घ्यावी.

- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

जिल्ह्यातील शाळांची स्थिती

  • झेडपीच्या प्राथमिक शाळा

  • ३७४६

  • एकूण विद्यार्थी

  • २.०३ लाख

  • महापालिकेच्या शाळा

  • २२१

  • विद्यार्थी संख्या

  • ९९,५७५

  • माध्यमिक शाळा

  • १०८७

  • एकूण विद्यार्थी

  • ४.०३ लाख

अडीच लाख मुलांनी लस घेतलीच नाही

सोलापूर शहर-जिल्ह्यात १२ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या चार लाख ६८ हजार ९७८ आहे. त्यात १२ ते १४ वयोगटातील मुलांची संख्या दोन लाख ४२ हजार ५६६ तर सव्वादोन लाखांवर १५ ते १८ वयोगटातील मुले आहेत. सध्या १२ वर्षांवरील सर्वच मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना कोरोनावरील प्रतिबंधित (कोर्बोव्हॅक्स) लस टोचली जात आहे. पण, सोलापूर जिल्ह्यातील तब्बल दोन लाख ७३ हजार मुलांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी तेवढ्या मुलांचे लसीकरण आवश्यक मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : जळगाव-पाचोरा रोडवर भीषण अपघातात; ३ शाळकरी मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT