Corona children Dont worry Board to conduct 10th-12th Supplementary Exam
Corona children Dont worry Board to conduct 10th-12th Supplementary Exam sakal
महाराष्ट्र

कोरोनाबधित असल्यास 10 वी, 12वीच्या मुलांची होणार पुरवणी परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील दहावी-बारावीतील 32 लाख विद्यार्थ्यांची 4 मार्चपासून परीक्षेला सुरवात होणार आहे. परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे, परंतु परीक्षेपूर्वी कोरोना बाधित अथवा परीक्षा देताना कोरोना झालेल्या मुलांची स्वतंत्रपणे पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे.(10th-12th Supplementary Exam)

दहावी-बारावीतील जवळपास साडेसहा लाख विद्यार्थ्यांकडे ऍन्ड्राईड मोबाईल्स नाहीत. त्यामुळे त्यांना शाळा बंद झाल्यानंतर ऑनलाइन शिक्षणदेखील घेता आले नाही. कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षात बहुतेक दिवस शाळा बंदच राहिल्या. ऑनलाइन शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना दिले. मात्र, बारावीच्या विद्यार्थ्यांना विशेषत: विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने अध्यापन पचनी पडले नाही. त्यामुळे दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांचे ऑफलाइन वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय झाला. सध्या कोरोना वाढत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही या संभ्रमात पालक आहेत. अशा परिस्थितीत 4 मार्चपासून बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे. परीक्षेपूर्वी कोरोना बाधित आढळलेल्या मुलांची पुन्हा स्वतंत्रपणे पुरवणी परीक्षा घेतली जाणार असून त्यासंबंधीचा प्रस्ताव शालेय शिक्षणमंत्र्यांकडे पाठविला जाणार आहे. नियमित परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसोबत कोरोना झाल्याने परीक्षा देता न आलेल्यांचीही परीक्षा होईल, असेही बोर्डाकडून सांगण्यात आले. तत्पूर्वी, कोरोना झाल्याने किती मुले परीक्षा देऊ शकणार नाहीत, याची माहिती संकलित केली जाणार आहे.

कोरोनाचा रिपोर्ट बंधनकारक

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून त्यात 18 वर्षांखालील अनेक मुले बाधित होऊ लागली आहेत. तरीही, 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोवॅक्‍सिन लस दिली जात असून आता शाळा सुरु झाल्यानंतर शाळांमध्येच लसीकरणाचे कॅम्प घेतले जाणार आहेत. दरम्यान, परीक्षेपूर्वी कोरोना बाधित मुलांना परीक्षा देता न आल्यास त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षेचे नियोजन केले जाईल. नियमित परीक्षा संपल्यानंतरच काही दिवसांतच त्यांची परीक्षा होईल. परंतु, त्या विद्यार्थ्यांना कोरोना रिपोर्ट अथवा सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दाखला मुख्याध्यापकांच्या माध्यमातून शिक्षणाधिकाऱ्यांकडे द्यावा लागणार आहे.

''दहावी-बारावीची परीक्षा नियोजित वेळेतच घेण्याचे नियोजन आहे. कोरोना बाधित विद्यार्थ्यांची आणि नियमित परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची एकत्रितपणे पुरवणी परीक्षा होईल. बाधितांची संख्या अधिक असल्यास नियमित व पुरवणी परीक्षेचा निकाल एकत्रित जाहीर होईल. जेणेकरून त्यांचे वर्ष वाया जाणार नाही.''

- शरद गोसावी, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीने राखला घरचा गड! तिलक वर्मा शेवटपर्यंत लढला, मात्र मुंबईच्या पदरी पराभवच

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : एक सच्चा देशभक्त संसदेत पोहोचणार आहे- आशिष शेलार

SCROLL FOR NEXT