corona updates esakal
महाराष्ट्र बातम्या

Corona Updates : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट राज्यात पाय पसरतोय; सोमवारी २८ रुग्णांची नोंद

राज्यात सोमवारी कोरोनाचे नवीन २८ रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या १६८ पर्यंत गेलीय.

संतोष कानडे

Maharashtra Corona Updates : राज्यात सोमवारी कोरोनाचे नवीन २८ रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या १६८ पर्यंत गेलीय. सर्वाधिक केसेस मुंबईत आहेत. त्यापाठोपाठ ठाणे आणि पुण्यात रुग्णांची नोंद होतेय.

मुंबईमध्ये सध्या कोरोनाचे ७७ रुग्ण आहेत. तर ठाण्यात २९, रायगडमध्ये १७, पुण्यात २३ रुग्ण आढळून आलेले आहेत. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट JN.1 मुळे संक्रमित झालेल्या १० रुग्णांची खात्री झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक पाच रुग्ण ठाण्याचे आहेत.

रविवारी ५० रुग्णांची नोंद

रविवारी बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आम्ही विषाणूचे नमुने तपाणीसाठी पाठवलेले आहेत. जेएन. १ व्हेरिएंटच्या तपासणीसाठी पुण्याच्या लॅबला नमुने पाठवले आहेत. राज्यात रविवारी ५० नवीन केसेस आढळलेल्या आहेत. 'एबीपी न्यूज'ने हे वृत्त दिले आहे.

दुसरीकडे राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनादेखील कोरनाची लागण झालेली आहे. त्यांनीच याबाबत सोशल मीडियातून पोस्ट करत माहिती दिली.

देशामध्ये रविवारी कोरोनाच्या नवीन व्हायरसचे ६५६ रुग्ण आढळून आलेले आहेत. देशात आतापर्यंत ३ हजार ७४२ नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. शनिवारी ७५२ कोरोना रुग्ण आढळून आलेले होते. नवी दिल्ली, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, तमिळनाडू, तेलंगणा या राज्यांमध्ये नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup : थरार... दक्षिण आफ्रिकेने दोनवेळा पराभव टाळला ! डबल Super over मध्ये अफगाणिस्तानचा करेक्ट 'गेम' केला

Tutankhamun’s Tomb : थडग्यात सापडली 3,300 वर्षे जुनी सँडल; शत्रूंना पायाखाली तुडवायचा राजा, सँडल्सवर का कोरली होती शत्रूंची चित्रे?

Post Office Jobs 2026: ग्रामीण डाक सेवक पदांची भरती अंतिम टप्प्यात; या उमेदवारांना संधी, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update : पोलीस भरतीदरम्यान 1600 मीटर धावताना उमेदवाराने गमावला जीव

"त्यांना मी रजनीकांतप्रमाणे धुणार" करण जोहर आणि विकीवर भडकला गोविंदा ; हे आहे कारण !

SCROLL FOR NEXT