home treatment of corona patients esakal
महाराष्ट्र बातम्या

कोरोना रुग्णांना ‘होम आयसोलेशन’ची परवानगी! ७ दिवस घरात राहण्याचे बंधन

लक्षणे नसलेल्यांना त्यांच्या घरी राहून उपचार घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, त्यांना सात दिवस घरात राहण्याचे बंधन घातले गेले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोना झाला, पण लक्षणे नाहीत, मग दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यापेक्षा स्वत:च्या घरी राहूनच उपचार घेता येणार आहे. लक्षणे नसलेल्यांना त्यांच्या घरी राहून उपचार घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, त्यांना सात दिवस घरात राहण्याचे बंधन घातले गेले आहे. शहर-ग्रामीणमध्ये सध्या १५ रुग्ण असून, सर्वजण त्यांच्या त्यांच्या घरीच उपचार घेत आहेत.

राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहर-जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. साडेचारशेपर्यंत खाली आलेली सक्रिय रुग्णांची संख्या आता साडेसोळा हजारांवर गेली आहे. सोलापूर शहर- जिल्ह्यातही मागील काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. शहरात सोमवारी (ता. १३) एक नवीन रुग्ण आढळला असून. शहर- ग्रामीणमधील दोन रुग्ण बरे झाले आहेत. संशयितांचे टेस्टिंग वाढविल्यास त्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज आहे. जिल्ह्यातील २७ लाख व्यक्तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचली आहे. त्यामुळे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊनही अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत नाहीत. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील महापालिकेच्या एकाही नागरी आरोग्य केंद्रात कोरोना रुग्णांवरील उपचाराची सोय नाही. शहर- ग्रामीणमधील कोरोनाबाधित रुग्णांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरवातीला काही बेड्‌स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तरीही, लक्षणे नसलेले किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले रुग्ण घरी राहूनच उपचार घेत आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे आढळून येत नाहीत. मध्यम किंवा तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराची सोय आहे. लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना त्यांच्या घरी राहून उपचार घेण्यास (होम आयसोलेशन) परवानगी आहे.

- डॉ. बसवराज लोहारे, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका

सात दिवस घरात राहण्याचे बंधन

कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णाला २८ दिवसांपर्यंत घरातच राहण्याचे बंधन घालण्यात आले होते. त्यानंतर हा कालावधी १४ दिवसांवर आला आणि मागच्या लाटेत कोरोनाबाधिताला १० दिवस घरात राहावे लागत होते. आता प्रतिबंधित लसीकरणामुळे बऱ्याच रुग्णांना काहीच लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यांना घरी राहून उपचारास परवानगी आहे. पण, सात दिवस त्या रुग्णाला स्वत:च्या घरात राहावे लागणार आहे. मास्क, स्वतंत्र खोली असे निकष कायम ठेवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial : 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या धर्तीवर होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक; 350 कोटींचा विकास आराखडा तयार, उदय सामंतांची मोठी घोषणा

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Latest Marathi News Update : तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा वाद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

SCROLL FOR NEXT