corona 
महाराष्ट्र बातम्या

राज्याची चिंता कायम! कोरोनाबाधितांची संख्या आठ हजारांवर

सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात रविवारी कोरोनाच्या 440 नव्या रुग्णांची नोंद झाली; त्यामुळे बाधितांची संख्या 8068 वर गेली. आणखी 112  रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत एकूण 1188 जणांना घरी पाठवण्यात आले आहे. राज्यात 11 पुरुष व 8 महिला अशा आणखी 19 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मुंबईतील 12,  पुण्यातील तीन, जळगावमधील दोन आणि सोलापूर व लातूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.  

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या 19 रुग्णांपैकी सात जण 60 वर्षे किंवा त्यावरील, 10 जण 40 ते 59 वयोगटातील आणि दोन जण 40 वर्षांखालील होते. 11 रुग्णांना (73 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग असे अतिजोखमीचे आजार होते. चार रुग्णांच्या इतर आजारांबाबत माहिती मिळालेली नाही. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 342 वर गेली आहे. आतापर्यंत राज्यातील 1188 बऱ्या झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 1,36,926 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आणि 9160 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

थोडक्यात आकडेवारी
तपासलेले नमुने : 1,16,345 
निगेटिव्ह : 1,07,519 
पॉझिटिव्ह : 8,068 
क्लस्टर कंटेनमेंट झोन : 604 
सर्वेक्षण पथके : 8,603 
पाहणी झालेले नागरिक : 33.72 लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT