Eye
Eye Sakal
महाराष्ट्र

कोरोनामुळे डोळ्यांच्या रेटिनाला धोका, राज्यासह मुंबईत डोळ्यांच्या समस्या वाढल्या

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - देशभरात कोरोनामुळे डोळ्यांच्या रेटिनाला धोका निर्माण झाल्याचे अनेक रुग्णांमध्ये दिसून आले आहे. परंतु,  सध्या डोळ्याच्या रेटिनाला धोका पोहोचलेल्यांची संख्या ही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहे. मात्र, यात तरूणांना हा आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जे कोरोना रुग्ण आहेत, त्यांनी पहिल्यांदा डोळे चेकअप करून घेणे, अत्यंत आवश्यक असल्याचे डॉ. अगरवाल्स आय रूग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अमर अगरवाल यांनी सांगितले.

डॉ. अगरवाल आय रुग्णालयाद्वारे पुढील 18 ते 24 महिन्यात मुंबई व उर्वरित महाराष्ट्रात 20 आय केयर सुविधा उभारण्यासाठी 300 कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार आहे, अशी घोषणा शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.

मधुमेह व लहानपणापासून ज्यांना चष्मा लागला आहे, अशांना डोळ्यांच्या रेटिनाची समस्या उद्भवते. मात्र, ज्यावेळी डेंग्यूची साथ पसरली होती, तेव्हा डोळ्यांचा आजार मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. 40 ते 45 वर्षातील नागरिक ज्यांना मधुमेह, बल्ड प्रेशर आहे अशा रुग्णांना डोळ्याच्या रेटिनाच्या समस्येला सामोरे जावे लागते. कोरोना महामारीपासून मुंबईसह बाहेरील रुग्णांमध्ये 2 ते 3 टक्के डोळ्याच्या रेटिनाचा धोका वाढलेला आहे. 2 टक्के रेटिनाची समस्या ही मधुमेह रुग्णांमध्ये आढळून येते. तसेच ज्यांना लहानपणापासून चष्मा लागला आहे, अशा 5 टक्के रुग्णांमध्ये ही समस्या दिसून येते. त्यामुळे आता दरवर्षी डोळे चेकअप करून घेणे, गरजेचे असल्याचे आदित्य ज्योत रुग्णालय, मुंबईचे अध्यक्ष डॉ. एस. नटराजन यांनी सांगितले.

आय केअर चेनने जगभरात आपली साखळी तयार करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची विस्तार योजना आखली आहे. त्याअंतर्गत पुढील 3 वर्षात 100 नवीन रुग्णालये, 500 व्हिजन सेंटर्स तयार केले जाणार आहे.

मुंबईतील आदित्य ज्योत रुग्णालयाचे डॉ. अगरवाल्स आय रुग्णालयामध्ये विलिनीकरण करण्यात आले असून ती देशातील आय रुग्णालय चेनमधील 100 वी शाखा ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT