Corona Update Sakal
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: राज्यात आज शंभरच्यावर कोरोना रुग्णांची नोंद; तर रिकव्हरी रेट ९८ टक्क्यांवर

राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Corona Update : राज्यात दिवसभरात शंभरहून अधिक नव्या कोरोनाबाधित नागरिकांची नोंद झाली. तर ७५ रुग्णांना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळं राज्यातील कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाणं हे ९८.१७ टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. (Corona Update 138 Corona patients reported in Maharashtra today)

या माहितीनुसार, राज्यात आज १३८ नवीन रुग्णांचे निदान झालं. तसेच ७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत एकूण ८०,२३,७२० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) ९८.१७ टक्के एवढं झाला आहे.

तसेच राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर १.८१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,७६,६४,१४५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,७३,१४९ (९.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, आज राज्यात १४,०७७ चाचण्या झाल्या आहेत. त्यांपैकी २१७३ RT-PCR चाचणी, ११,९०६ RAT चाचणीची नोंद प्रयोगशाळेत झालेली आहे. आजचा पॉझिटिव्हीटी १.० टक्के आहे.

JN.1 व्हेरीएंटचे किती रुग्ण?

सध्या राज्यात XBB.१.१६ ह्या व्हेरीएंटचे १९७२ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर JN.1 या व्हेरियंटच्या ३२ रुग्णांची नोंद झाली आहे. यांपैकी सर्वाधिक पुण्यात १७ रुग्ण, ठाणे - ५, बीड -३, संभाजीनगर - २, कोल्हापूर - १, अकोला - १, सिंधुदुर्ग - १, नाशिक - १, सातारा - १ सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT