maha_covid 
महाराष्ट्र बातम्या

Corona Update : राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर, दिवसभरात २९७ बाधितांचा मृत्यू!

सकाळ डिजिटल टीम

राज्यात कोरोनाच्या संसर्गाची स्थिती अद्यापही गंभीर आहे. मंगळवारी राज्यात ५५,४६९ रुग्ण आढळून आले असून २९७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ३४,२५६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात ५५,४६९ रुग्ण आढळून आले असून २९७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३१,१३,३५४ इतकी असून यांपैकी ४,७२,२८३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यात आजवर २५,८३,३३१ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आजवर ५६,३३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण ४,७२,२८३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८२.९८ टक्के झालं आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज विविध राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

कोरोना लाट : भारतासाठी पुढील चार आठवडे चिंताजनक; केंद्राचा गर्भित इशारा

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा. २५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे. महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश द्यावेत अशी विनंती यावेळी टोपे यांनी केली. यावेळी राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT