मुंबई : राज्यात आज दिवसभरात 6,388 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 63,75,390 झाली आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी कमी होऊन 62,351 इतकी झाली. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.
आज दिवसभरात 8,390 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 61,75,010 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.86 टक्के एवढे झाले आहे.
राज्यात मृत्यूचा आकडा पुन्हा वाढला असून आज 208 रुग्ण दगावले. बुधवारी 137 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली होती. ठाणे मंडळात आज सर्वाधिक मृत्यू झाले असून तेथे 81 मृत्यूची नोंद झाली. नाशिक 13, पुणे 48, कोल्हापूर 52, लातूर 11, अकोला 1 तर नागपूर मंडळात 1 मृत्यू नोंदवले गेले. औरंगाबाद मंडळात शून्य रुग्णांची नोंद झाली. राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,34,572 वर पोहोचला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,03,26,812 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,75,390 (12.63 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,98,397 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 2,507 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.