Maharashtra Corona Update Sakal Media
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: राज्यात चार मंडळात केवळ 337 नवे रुग्ण

कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील चार मंडळांमध्ये नव्या बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याचे दिसते. औरंगाबाद, लातूर, अकोला आणि नागपूर या चार मंडळांमध्ये केवळ 337 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यात सर्वाधिक कमी नागपूर मंडळात केवळ 7 नव्या रुग्णांची नोंद झाली असून त्यानंतर अकोला 26, औरंगाबाद आणि 49 लातूर 255 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यातील कोविड बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असल्याचे दिसत असले तरी सहा मंडळात 93 टक्के बाधित रुग्ण आहेत. अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या मंडळांचा यात समावेश आहे.

आज राज्यात 4,869 नवे रुग्ण सापडले. त्यातील 4,532 (93 टक्के) रुग्ण केवळ चार जिल्ह्यातील आहेत. त्यातील सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यांतील 1574, त्यानंतर कोल्हापूर 1399 , नाशिक 829, ठाणे 730 रुग्णांचा समावेश आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या 15,473 सक्रिय रुग्ण असून, सांगली 7774, सातारा 7416, ठाणे 6068 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात मृत्यूची संख्या देखील कमी झाल्याचे दिसले.

मृत्यूचा आकडाही 100 च्या आत आला असून आज 90 कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. औरंगाबाद आणि अकोला मंडळाच्या एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. पुणे मंडळात आज सर्वाधिक मृत्यू झाले असून तिथे आज अनुक्रमे 38 मृत्यूची नोंद झाली. ठाणे 15, नाशिक 8, कोल्हापूर 25, लातूर 3 मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के इतका आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,33,038 वर पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT