corona update sakal Media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोय; ओमिक्रॉनचा नवा रुग्ण नसल्यानं दिलासा

दिवसभरातील कोरोनाच्या स्थिती जाणून घ्या...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात आज 2,172 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर 21 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं मृतांचा एकूण आकडा 1 लाख 41 हजार 476 वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात एकही ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळला नाही. (corona update maharashtra daily corona news)

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज 2,172 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले. त्यामुळं करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 66,61,486 वर पोहोचली आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 11,492 इतकी झाली आहे. 

दरम्यान, आज 1,098 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळं कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 65,04,831 इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून 97.65 टक्के एवढं झालं आहे. सध्या राज्यात 1 लाख 11 हजार 231 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 910 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात ओमायक्रॉन बाधिताची नोंद नाही

राज्यात आज एकही ओमायक्रोनबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. त्यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा 167 वर स्थिर आहे. त्यापैकी 91 रुग्णांचा आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आलं आहे. आतापर्यंत 786 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यांपैकी 141 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT