Corona-test-maha 
महाराष्ट्र बातम्या

Corona Update : राज्यात दिवसभरात ५,६०९ रुग्णांची नोंद

मृतांच्या संख्येत मात्र वाढ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात आज दिवसभरात 5,609 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 63,63,442 झाली आहे. तसेच राज्यात मृत्यूचा आकडा पुन्हा वाढला असून आज 137 रुग्ण दगावले. सोमवारी 68 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली होती.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी कमी होऊन 66,123 इतकी झाली. आज दिवसभरात 7,720 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 61,59,676 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  96.8 टक्के एवढे झाले आहे.

पुणे मंडळात आज सर्वाधिक मृत्यू झाले असून तेथे 46 मृत्यूची नोंद झाली. ठाणे 19, नाशिक 11, कोल्हापूर 43, औरंगाबाद 8, लातूर 5, अकोला 4 तर नागपूर मंडळात 1 मृत्यू नोंदवला गेला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के इतका आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,34,201 वर पोहोचला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,99,05,096 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,6342 (12.75 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,13,437 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 2,860 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT