corona file photo
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: राज्यात कोरोनाचा कहर; मृतांची वर्षभरातील उच्चांकी नोंद

राज्यात मृत्यूने कहर केला असून गेल्या वर्षभरातील उच्चांकी नोंद आज झाली. आज 772 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूचा दर 1.52 % इतका आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- राज्यात मृत्यूने कहर केला असून गेल्या वर्षभरातील उच्चांकी नोंद आज झाली. आज 772 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूचा दर 1.52 % इतका आहे. राज्यात आज दिवसभरात 66,836 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 41,61,676 झाली आहे.  आज नोंद झालेल्या 772 मृत्यूंपैकी 360 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 224 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 189 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.52 % एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण 6,91,851 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,51,73,596 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 41,61,676 (16.53 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 41,88,266 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,378 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज 74,045 रुग्ण कोरोनामुक्त

आज 74,045 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 34,04,792 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.81 % एवढे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT