corono
corono 
महाराष्ट्र

Corona Update: स्थिती गंभीर! राज्यात कोरोना रुग्णसंख्येने पुन्हा ओलांडला 30 हजारांचा टप्पा

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेषत: महाराष्ट्र आणि पंजाब राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 31,855 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 15098 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी 95 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. मंगळवारी राज्यात 28 हजारांच्या जवळपास कोरोना रुग्ण आढळून आले होते, तर सोमवारी 25 हजारांच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. रविवारी कोरोना रुग्णांची संख्या 30 हजारांच्या पुढे गेली होती, ती आता पुन्हा 32 हजारांच्या जवळ गेलीये. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येमध्ये चढउतार पाहायला मिळतोय. आरोग्य विभागाने यासंदर्भातील माहिती दिलीये.

राज्यात आतापर्यंत 25,64,881 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 22,62,593 लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत 53,684 लोकांचा बळी घेतला आहे. राज्यात 2,47,299 सक्रीय रुग्ण आहेत. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याची स्थिती होती. पण, मार्च महिन्यापासून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. विशेष म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या खूप अधिक आहे. शिवाय देशात सापडणाऱ्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात 60 ते 65 टक्के रुग्ण संख्या आढळून येत आहे. 

देशातील पाच राज्यांमध्ये एकूण कोरोनाबाधितांच्या 85 टक्के रुग्णसंख्या आढळत आहे. विशेषत: महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये परिस्थिती गंभीर आहे. देशातील 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाचे दोन नवे स्ट्रेन आढळून आल्याचे केंद्र सरकारने आज जाहीर केले आहे. महाराष्ट्रातही या नव्या स्ट्रेनचा शिरकाव झाला. त्यामुळे राज्यासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. नागरिकांना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

Chandu Champion : 'चॅम्पियन आ रहा है'...कार्तिकच्या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज; लूकची होतेय चर्चा

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT