corono_
corono_ 
महाराष्ट्र

Corona Update: राज्यात कालच्या तुलनेत रुग्ण संख्येत घट; 102 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था

मुंबई- देशासह महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 40 हजारांचा आकडा पार केला होता. पण, सोमवारी काही प्रमाणात या संख्यमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 31,643 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर 102 रुग्णांना मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 20,854 रग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 27,45,518 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, तर 23,53,307 लोकांनी कोरोनाला हरवलं असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत 54,283 रुग्णांचा बळी घेतला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात सध्या 3,36,584 सक्रिय रुग्ण संख्या आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी महाराष्ट्रातील रुग्णांचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रात देशातील एकूण रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण आढळून येताहेत. गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे राज्यात अनेक निर्बंध लादण्यात आलेत. शिवाय महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशात कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 9 हजारांनी कमी झाल्याने थोडासा दिलासा मिळणार आहे. 

दरम्यान, राज्यात आज 102 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण 102 मृत्यूंपैकी 85 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 14 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 3 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे 3 मृत्यू ठाणे 2 व अकोला-1 असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.98 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,94,95,189  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 27,45,518 (14.08 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात 16,07,415 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 16,614 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खाणीत लिफ्ट पडल्याने 14 लोक अडकले, बचाव कार्य सुरू...7 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

SCROLL FOR NEXT