corono 
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: राज्याची स्थिती अद्यापही चिंताजनक, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण घटलं

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या 20 हजारांच्या पुढे आढळत आहे. रविवारी राज्यात 30 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज राज्यात 24645 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कालच्या पेक्षा आज कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी ती लक्षणीय नाही. कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळतोय. गेल्या 24 तासांत राज्यात 19463 लोकांनी कोरोनावर मात केली. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत  2234330 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी पाठवण्यात आले. राज्यात सध्या 215241  कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील बरे होणाऱ्यांचे प्रमाण 89.22 % आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याची माहिती दिली. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलंय. 

राज्यात आज 24645 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 19463 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2234330 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 215241 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.22 % झाले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी ट्विटमध्ये दिलेय. गेल्या दिवसापेक्षा आज कोरोना रुग्णांच्या संख्येत थोडीशी घट झाली आहे.

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर्स पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं. आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात मेट्रो शहरांमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढतंच आहेत. सध्या ज्या वेगानं कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय त्यासाठी आपल्याला आणखी तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे आपले जेवढे जंबो सेंटर्स होते त्या सर्वांना पुन्हा एकदा अॅक्टिवेट करायचं आहे. काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये आम्ही स्पष्ट सांगितल की, ज्या ठिकाणी डॉक्टर्सची आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज आहे तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने भरती करायची आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gas Connection : महिन्यात ४० हजार पाईप गॅस कनेक्शन; कोल्हापूर शहरात राजारामपुरीसह काही उपनगरांत जोडणी पूर्ण

Latur Accident: चाकूरमध्ये भीषण अपघात; सिमेंट मिक्सरखाली येऊन नगरपंचायती कर्मचारी ठार

South Africa vs New Zealand: दक्षिण आफ्रिकन संघाची विजयी सलामी; न्यूझीलंडवर सात विकेट राखून मात; मोकोएना ठरला सामनावीर

Kolhapur Scam : गॅस कनेक्शन बंद होण्याच्या; नावाखाली फसवणुकीचा धोका, पुणे - मुंबईतील सायबर गुन्हेगार झाले सक्रिय

Latest Marathi Update : दुबईतील ड्रोन हल्ल्यांनतर एमिरेट्सचे विमान तिरुवनंतपुरमला माघारी परतले

SCROLL FOR NEXT