महाराष्ट्र बातम्या

पुन्हा कोरोनाची लाट? मुंबईसह राज्याच्या 'या' भागात केसेसमध्ये सातपट वाढ

भाग्यश्री भुवड

मुंबई: राज्याच्या अमरावतीत कोविड 19 केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून इतर राज्याच्या तुलनेत ही सर्वाधिक आहे. मुंबई, पुणे, नागपूरनंतर अमरावतीत दररोजच्या केसेसची सर्वाधिक नोंद करण्यात आली आहे. 

रविवारी अमरावतीत कोविड -19 चे 430 नवीन रुग्ण सापडले असून मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर अमरावतीने सर्वाधिक रुग्णांचा टप्पा गाठला आहे.  महिन्याभरापूर्वीपर्यंत अमरावती शहरात दिवसाला 70  पेक्षा कमी केसेसची नोंद होती. एका महिन्यात संपूर्ण जिल्ह्यातील केसेसमध्ये वाढ होण्याचे प्रमाण अधिकाऱ्यांची चिंता वाढवणारे आहे.

जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींकडून चार नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले आहेत. कोरोनाचा यूके व्हेरिएंट किंवा आफ्रिकन प्रकार यांच्या शरीरात सापडतो का? किंवा संपूर्णपणे हा व्हायरस बदलेला आहे का ? हे यातून तपासले जाणार आहे. एनआयव्ही ( नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) कडून येणाऱ्या अहवालाची सध्या प्रतिक्षा आहे तसंच, सोमवारीही आणखी पाच नमुने जीनोमसाठी संकलित केले गेले. 

“आम्ही कोविड -19 केसमधील एक नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवला जो एका महिन्यापूर्वी युकेमधून परत आला होता. पण, त्याच्या या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र दुसर्‍या एका घटनेत आफ्रिकाहून परतलेल्या एका महिलेची चाचणी पॉझिटिव्ह आली पण, ही महिला फरार झाली. तिचा शोध घेण्यासाठी आम्ही पोलिसांची मदत घेतली पण तिने आपला फोन बंद केला होता, असे जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. 

जिल्हा अधिकार्‍यांना चिंता करण्याची बाब म्हणजे संपूर्ण कुटुंबीय कोविड -19 पॉझिटिव्ह येत आहेत, ज्यांची लक्षणे सौम्य आहेत. " नुकतंच कुटुंबातील काही जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली. म्हणजेच व्हायरसची संक्रमितता वाढली आहे, असे निकम यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील सक्रिय प्रकरणांची संख्या 2, 828 पर्यंत वाढली असून 14 जानेवारीपर्यंत ही संख्या 399 होती.  जी सात पटीने वाढलेली दिसते. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोक मास्क घालण्यासाठी आणि सोशल डिस्टस्टिंग पाळत नसल्याने मोठी समस्या पुढे येत आहे. 

अचलपूर आणि अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मोर्ची आणि तिर्सा हे नवीन दोन नवीन हॉटस्पॉट ठरत आहेत. 

अमरावतीत सध्या पॉझिटिव्हीटी 12.4 टक्के आहे,पण सर्व केसेसमध्ये सौम्य लक्षणे आहेत. मृत्यू अजूनही वाढलेले नाहीत. विदर्भातील इतर आठ जिल्ह्यांमध्येही पॉझिटिव्हीटीच्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. याउलट मुंबईत पॉझिटिव्हीटीचे प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. अमरावतीत 26,124 बाधित रुग्ण होते. त्यापैकी,  22,620 बरे झालेले रुग्ण आहेत. आतापर्यंत 412 मृत्यू हे कोविडमुळे झाले असून 2 मृत्यू इतर कारणांनी झाले आहेत. दरम्यान, सध्या 3090 एवढे सक्रिय रुग्ण आहेत.

-----------------------------

(संपादन - पूजा विचारे)

Corona Virus Updates Mumbai highest number of daily Corona cases

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT