corona 
महाराष्ट्र बातम्या

स्वातंत्र्य दिनाच्या शासकीय समारंभासाठी कोरोना योद्धे निमंत्रित 

प्रमोद बोडके

सोलापूर : भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन (15 ऑगस्ट) येत्या शनिवारी साजरा होणार आहे. यंदाच्या या समारंभावर कोरोनाच्या संसर्गाचे सावट असल्याने हा समारंभ सोशल डिस्टन्ससह कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून साजरा केला जाणार आहे. या समारंभामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांची पत्नी/ आई-वडील यांच्यासोबतच कोरोना योद्यांना (डॉक्‍टर, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह कोरोनामुक्त झालेले नागरिक) शासकीय समारंभात निमंत्रित केले जाणार आहे. 

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने या समारंभाची सूचना व नियमावलीच आज प्रसिद्ध केली आहे. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी 9.05 मिनिटांनी आयोजित केला जाणार आहे. सकाळी 8:35 ते 09:35 या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करू नये अशी स्पष्ट सूचना करण्यात आली आहे.

जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करायचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 च्या पूर्वी किंवा 09:35 च्या नंतर आयोजित करावा अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. राज्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात सकाळी 9.05 मिनिटांनी होणार आहे, राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या हस्ते पुण्यामध्ये ध्वजारोहण समारंभ होणार आहे. 

सर्वांसाठी मास्क बंधनकारक असून जास्तीत जास्त नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचीही सूचना करण्यात आली आहे. या कार्यक्रमातून व सोशल मीडियाद्वारे "आत्मनिर्भर भारत' या घोषणेचा प्रसार करण्याची ही सूचना करण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी वाद, विवाद स्पर्धा, देशभक्तिपर निबंध स्पर्धा, कविता स्पर्धा आयोजित करण्यासही मुभा देण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात, १७ ते २५ वर्षीय ३ तरुणांचा मृत्यू; एक जण गंभीर

99 पर्सेंटाइलच्या वादानंतर सरकारचा मोठा निर्णय! आता इंजिनिअरिंग-फार्मसी प्रवेशासाठी बारावीचे मार्कही मोजणार

लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत काळाचा घाला! एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी हंबरडा फोडला; म्हणाले 'मॅनेजमेंट...'

Marathi News Live Updates : शिरूर गोळीबाराची घटना ताजी असतानाच सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून तरूणावर जीवघेणा हल्ला

RASHID KHAN: राशिद खानला कर्णधारपदावरून हटवलं, पण बातमीच मिळाली नाही? म्हणाला- ‘मलाही...’; अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT