Cotton production will increase by twenty-five percentage this year 
महाराष्ट्र बातम्या

कापूस उत्पादन यंदा 25 टक्‍क्‍यांनी वाढणार 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव - जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या 112 टक्के पावसामुळे यंदा खानदेशातील कपाशीचे उत्पादन भरघोस येणार आहे. कापूस उत्पादन 20 ते 25 टक्के अधिक येऊन जिनिंग प्रेसिंग व्यवसायाला झळाळी येणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना "अच्छे दिन' येण्याची चिन्हे आहेत. शासनाने कपाशीला यंदा पाच हजार 550 भाव जाहीर केला आहे. खासगी व्यापारी मात्र 4800 ते 5200 पर्यंत भाव देण्याची शक्‍यता आहे. 

खानदेशात मुख्य पीक कपाशी आहे. नगदी पीक म्हणून बहुतांश शेतकरी कपाशीचे उत्पादन घेतात. गेल्या चार वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊस अनियमित होता. यामुळे कपाशीचे उत्पादन मर्यादित राहिले. यंदा मात्र चांगला पाऊस झाल्याने कपाशीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. यंदा शेतकऱ्यांनी सात लाख हेक्‍टरवर कपाशीचा पेरा केला. त्यात 25 टक्के अधिक उत्पादन अपेक्षित आहे. 

साधारणतः दहा ते पंधरा ऑक्‍टोबर दरम्यान नवीन कापूस बाजारपेठेत येतो. यंदा अजूनही पाऊस सुरू आहे. आगामी काही दिवसांत पाऊस परत गेल्यानंतर कपाशी वेचणी सुरू होईल. यात सुमारे एक महिन्याचा कालावधी जाईल. यामुळे एक नोव्हेंबरला नवीन कपाशीचा हंगाम सुरू होईल, असे चित्र आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीवर कपाशीचा भाव अवलंबून असतो. भारतातून दरवर्षी 40 ते 45 लाख कापसाच्या गाठी निर्यात होतात. यंदा त्यात पाच ते सहा लाख अधिक गाठींची भर पडेल. 

चांगल्या पावसामुळे 20 ते 25 टक्के कपाशीचे अधिक उत्पादन येणार आहे. व्यापाऱ्यांना हमीभावाएवढा दर देणे शक्‍य होणार नाही. यामुळे शासनाने भावांतर योजना सुरू करावी, जिनर्सला पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात कपात करावी, आदी मागण्या शासनाकडे केल्या आहेत. 
- प्रदीप जैन, खानदेश जिनिंग प्रेसिंग मिल असोसिएशन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motor Vehicle Rules: दहा वर्षांची गाडी समजणार जुनी; 'फिटनेस फी' दहा पटींपर्यंत वाढली, केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा!

Indian Railway: सण-उत्सवात रेल्वेचा मोठा हातभार; वर्षभरात ४३ हजारांहून अधिक विशेष गाड्या!

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु

Mumbai Crime: हिंदी बोलली म्हणून ६ वर्षाच्या चिमुकलीला संपवलं; आईचं निर्दयी कृत्य, पण तपासात वेगळंच सत्य समोर आलं

Loni Kalbhor Crime : सराईत गुन्हेगार सद्दाम अन्सारीवर कडक कारवाई; एमपीडीएअंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध!

SCROLL FOR NEXT