pravin darekar गुगल
महाराष्ट्र बातम्या

दरेकरांना दिलासा, सोमवारपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश

सरकारी वकिलांनी इतर खटल्यांमध्ये व्यस्त असल्याने सोमवारची वेळ मागितली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने प्रविण दरेकर यांना दिलासा दिला असून सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी वकिलांनी इतर खटल्यांमध्ये व्यस्त असल्याने सोमवारची वेळ मागितली आहे. त्यामुळे दरेकर (Pravin Darekar) यांना सोमवारपर्यंत अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने (Mumbai Court) दिले आहेत. १९९७ मध्ये प्रवीण दरेकर हे मजूर होते. कालांतराने राजकारणात आले असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. यावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने या तक्रारीची दखल घेत चौकशीनंतर प्रवीण दरेकर हे मजूर नसल्याचं सांगत त्यांना अपात्र ठरवलं. मजूर म्हणून प्रवीण दरेकर हे सदस्यत्वाला अपात्र असल्याचं सहकार विभागाने स्पष्ट केलं होतं. विभागाने प्रविण दरेकर यांना अपात्र ठरवताना अनेक बाबींकडे लक्ष वेधलं होतं. मजूर म्हणजे अंगमेहनतीचे आणि शारिरीक श्रमाचे काम करणारी व्यक्ती, तसंच त्याचं उपजिविकेचं मुख्य साधन हे मजुरीच असेल. मात्र दरेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असं नमूद केलं होतं.

प्रवीण दरेकर यांची मालमत्तासुद्धा २ कोटी ९ लाख रुपेय इतकी असून, त्यांच्या नावावर ९० लाख रुपयांची संपत्ती असल्याचंही विधान परिषदेवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. शिवाय विधान परिषदेचे सदस्य म्हणून अंदाजे अडीच लाख रुपये मासिक उत्पन्न प्राप्त होत असल्याचंही दिसत असल्यानं तुम्हाला मजूर म्हणता येणार नाही असंही सहकार विभागाने त्यांच्या आदेशात स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT