corona virus  esakal
महाराष्ट्र बातम्या

Covid-19 : तज्ज्ञांना वाटतेय चौथ्या लाटेची भीती; आरोग्य यंत्रणांना महत्त्वाचं आवाहन

कोरोनाचे सतत बदलणारे व्हेरिएंट तसंच कोरोना नियमांचं पालन न करणं हे चिंताजनक ठरू शकतं, असंही संशोधक म्हणाले आहेत.

वैष्णवी कारंजकर

देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ होत असल्याचं दिसत आहे. यामुळेच आता संशोधकांनी सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवेतल्या तज्ज्ञांकडून सिरो सर्वेक्षण करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

या सर्वेक्षणाद्वारे कोरोनाच्या परिस्थितीचा, प्रसार, प्रचाराबद्दल धोरणे आखण्यासाठीचं नियोजन करणं शक्य होणार आहे. पुण्यातल्या केईएम हॉस्पिटलमधले संशोधक गिरीश दायमा म्हणाले, "देशभरातल्या कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता चौथ्या लाटेची भीती आहे. कोरोनाचे गंभीर परिणाम, रुग्णालयात दाखल करण्याची गरज आणि मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसी प्रभावी ठरल्यात. मात्र अजूनही लोकांनी बूस्टर डोस घेतलेला नाही. कोरोनाचे सतत बदलणारे व्हेरिएंट तसंच कोरोना नियमांचं पालन न करणं हे चिंताजनक ठरू शकतं."

२०२१ मघ्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, झालेल्या सिरो सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की, ग्रामीण भागात कोरोना संसर्गामध्ये वाढ झाली आहे. आणि तीन पैकी दोघांमध्ये आता अँटिबॉडी तयार झाल्या आहेत. सिरो सर्वेक्षण म्हणजे एखाद्या रोगाविरुद्ध अँटिबॉडी आहेत की नाही, याबद्दल रक्ताच्या नमुन्यांची चाचणी केली जाते. सध्या होणाऱ्या संसर्गाचं प्रमाण आणि स्वरुप तपासण्यासाठी हे एक महत्त्वाचं साधन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ कोटींची रोकड, ६ कोटींचे दागिने अन्...; काँग्रेस आमदाराकडे आढळलं घबाड, जप्त केलेल्या मुद्देमालाचा आकडा वाचून व्हाल थक्क

"माझ्या मुलाला वाचवा मी..." मुलाच्या जन्मावेळेस ढसाढसा रडू लागला गोविंदा; "गर्भलिंग निदान चाचणी.."

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

SCROLL FOR NEXT