covid 19 covid 19
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्र : 14 जिल्ह्यातील निर्बंध हटवले; उर्वरित जिल्ह्यात काय नियम?

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध आता शिथील केले जात आहेत. राज्य सरकारने १४ जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानं तिथले निर्बंध हटवले आहेत. तर उर्वरित जिल्ह्यात काही निर्बंध कायम ठेवले आहेत. ए वर्गात असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध हटवण्यात आले आहेत.

ज्या जिल्ह्यात पहिला डोस ९० टक्के आणि दुसरा डोस ७० टक्के नागरिकांनी घेतला असेल त्या जिल्ह्याचा समावेश ए वर्गात आहे. तसंच पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांहून कमी आणि ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांहून कमी भरलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

निर्बंध हटवलेले जिल्हे कोणते?

मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर

उर्वरित जिल्ह्यात काय आहेत निर्बंध?

ए वर्गातील जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये काही निर्बंध अद्याप कायम आहेत. यामध्ये अंत्यसंस्कार, लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा स्पर्धा यांसाठी ५० टक्के उपस्थितीसह परवानगी देण्यात आली आहे.

शॉपिंग मॉल्स, सिनेमागृहे, रेस्टॉरंट हे पूर्ण क्षमतेने उघडण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहेत. तसंच जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळे, नाट्यगृहे, पर्यटन स्थळे, मनोरंजन पार्क या ठिकाणी ५० टक्के क्षमतेची मर्यादा कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

By-elections in Seven States : बिहार निवडणुकीसोबतच सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा!

India ODI Squad: 'फक्त गंभीरच्या हो ला हो करा, भारतीय संघात निवड होईल', हर्षित राणाला संधी देण्यावरून दिग्गज क्रिकेटपटू भडकले

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार! पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल; पण कधी कुठे कोणती कार्यक्रम?

गवळण सादर करताना मराठी दिग्गज कोरियोग्राफर बरोबर घडलेला लज्जास्पद प्रकार; "मी त्याचवेळी.."

SCROLL FOR NEXT