Covid Centre Scam Sakal
महाराष्ट्र बातम्या

Covid Centre Scam: कोविड सेंटरमध्ये बीएमसी अधिकाऱ्यांना वाटले 60 लाख रुपयांचे सोने, ईडीचा मोठा खुलासा

Covid Centre Scam: कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे.

राहुल शेळके

Covid Centre Scam: कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने म्हटले आहे की कोविड काळात, कोविड केंद्रांवर फक्त निम्मे कर्मचारी कामावर होते. त्यामुळे या कामगारांवर रुग्णांची काळजी घेण्याचा भार वाढला होता. असे गंभीर आरोप ईडीने केले आहेत.

जुलै 2020 ते फेब्रुवारी 2022 या काळात वरळी आणि दहिसर या दोन कोविड सेंटरमध्ये अनियमितता झाल्याचे ईडीने सांगितले आले. या कालावधीत 32.44 कोटी रुपये बेकायदेशीररित्या कमावले गेले. शुक्रवारी विशेष न्यायालयाने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचीही दखल घेतली. ज्यांच्या विरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे.

वरळी आणि दहिसर या दोन केंद्रांचे कंत्राट 2020 मध्ये या फर्मला देण्यात आले होते. कंपनीच्या चार भागीदारांनी मिळून बेकायदेशीरपणे पैसे कमावल्याचा आरोप आहे.

या चार जणांमध्ये संजय शहा आणि राजीव साळुंखे यांच्याशिवाय सुजित पाटकर (शिवसेना खासदार संजय राऊत यांचे सहकारी), हेमंत गुप्ता यांचा समावेश आहे. कर्मचारी अरविंद सिंग आणि दहिसर केंद्राचे डीन डॉ. किशोर बिसुरे यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आहे.

दहिसरमध्ये फक्त 50 टक्के कर्मचारी ड्युटीवर होते

पाटकर यांनी कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नसल्याचे सांगितले आहे. ईडीने दावा केला आहे की कोविड दरम्यान, या कंपनीने दोन्ही केंद्रांमध्ये घोटाळा केला होता.

कंपनीच्या भागीदारांनी BMC अधिकारी आणि इतर लोकांमध्ये 60 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे सोने वाटप केले होते. हे पैसे सोने, नाणी आणि बिस्किटांच्या रूपात देण्यात आले. ईडीने दावा केला आहे की दहिसर केंद्रात केवळ 50 टक्के कर्मचारी ड्युटीवर होते.

संजय शहा यांनी सोने खरेदी केले होते

पाटकर आणि बिसुरे यांना ईडीने जुलैमध्ये अटक केली होती. मिळालेल्या पैशातून संजय शहा यांनी सोने खरेदी केले. नंतर हे सोने सुजित पाटकर यांना देण्यात आले. हे सोने बीएमसी अधिकाऱ्यांमध्ये वाटण्यात आले.

वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या संख्येवर दुर्लक्ष करण्यासाठी पाटकर यांनी अधिका-यांना रोख रक्कम आणि इतर महागड्या वस्तू भेट दिल्या होत्या. त्याचबरोबर पाटकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Nirav Modi Extradition : नीरव मोदीला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग; CBI अन् EDचे संयुक्त पथक लंडनला जाणार!

Gautam Gambhir: 'लोकांनी आमच्या क्षेत्रात नाक खुपसू नये, आम्ही...', वनडे मालिका जिंकल्यानंतर IPL मालकावर भडकला गंभीर

Baramati Election : बारामतीच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात; निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात धाव!

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत पक्षप्रवेशावरून मतभेद होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT