महाराष्ट्र बातम्या

आता महिलांना मिळणार अधिक 'शक्ती', मंत्रिमंडळ बैठकीत शक्ती कायद्याला मंजुरी

सुमित बागुल

मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये अनिल देशमुख यांनी 'शक्ती' कायद्याबाबत माहिती दिली आहे.

पत्रकार परिषदेत अनिल देशमुख म्हणालेत की, "महिला आणि मुलींवर जे अत्याचार होतात यावर प्रतिबंध घालण्यासाठी शक्ती कायद्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. महिला आणि मुलींवर जे अत्याचार होतात त्यासंदर्भातील खटले फास्ट ट्रॅकनुसार निकाली काढत अशा आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देता येईल, यावर आज चर्चा झाली. दरम्यान, या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे आणि विधिमंडळात हा कायदा पास झाल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी केंद्राकडे पाठवण्यात येईल. 

काय 'शक्ती' कायद्यातील प्रस्तावित मुद्दे :  

  • महिला आणि मुलींवरील अत्याचाराचा तपास १५ दिवसात होणं गरजेचं 
  • ३० दिवसात त्यासंबंधीचा खटला चालवला जावा 
  • खटला संपल्यावर त्यावरील निकाल तात्काळ यावा
  • निकाल आल्यानंतर दोषींवर कायदेशीर कारवाई केली जावी 
  • याआधी अशा खटल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली जायची, मात्र या कायद्यामध्ये फाशीची शिक्षा प्रस्तावित

दरम्यान, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कायद्याला मंजुरी मिळालेली आहे. आता विधानसभेत यावर चर्चा होणार आहे. विधानसभेत चर्चा झाल्यानंतर हा कायदा केंद्राकडे मंजुरीकडे पाठवण्यात येईल त्यानंतर हा शक्ती कायदा राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल.  

crime against women maharashtra cabinet approves shakti law in cabinet meeting

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France vs Senegal : किलियन एमबापेने मोडला मेस्सीचा विक्रम अन् नोंदवले २ वर्ल्ड रेकॉर्ड; मुंबईपेक्षा लहान देशाची फ्रान्सला कडवी टक्कर

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

SCROLL FOR NEXT