CRIME  SAKAL
महाराष्ट्र बातम्या

Crime News : गुटखा पुडी न आणल्यामुळे मिञाने केला मित्राचा खून

पंचवीस हजारांचा दंड; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

राजेश नागरे

Jalna Crime News : गुटखा पुडी आणण्यावर केलेल्या मारहाणीत खून करणाऱ्या शंकर बाबूराव पवार (वय २०, रा. आदर्श कॉलनी, परतूर) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. भगत यांनी बुधवारी (ता.२६) तीन वर्षांची शिक्षा आणि पंचवीस हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

परतूर शहरात ता. २० ऑगस्ट २०१९ रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास गुटखा पुडी आणण्याच्या कारणावरून पवन तिखे (वय २०) याच्या डोक्यात बॅट मारून जखमी केले. पवन तिखे यांच्यावर उपचार सुरू असताना त्याचा ता. २२ऑगस्ट २०१९ जालना शहरातील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.

या प्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात खून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी परतूर पोलिसांनी आरोपीला अटक करून या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे या प्रकरणी एकूण दहा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, उत्तरीय तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी, उपचार करणारे डॉक्टर, पंच साक्षीदार, तपास अंमलदार सहायक पोलिस निरीक्षक एम.एल. पवार यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी शंकर बाबूराव पवार याला जिल्हा व सत्र न्यायाधीश भगत यांनी तीन वर्षांची शिक्षा आणि पंचवीस हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भारत खांडेकर यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT