Crude Oil  esakal
महाराष्ट्र बातम्या

Crude Oil : इराक, सौदी अरेबिया ना अमेरिका, भारत घेतोय "या" देशाकडून सर्वात जास्त क्रूड ऑइल

युक्रेन रशिया युद्धामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम

सकाळ डिजिटल टीम

Crude Oil : युक्रेन रशिया युद्धामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालाय. या युद्धामुळे अनेक देशांच्या व्यापारी संबंधांवर परिणाम झालाय. जसं की भारताच्या कच्च्या तेलाचे सर्वात मोठे पुरवठादार असलेल्या इराक आणि सौदी अरेबियासारख्या पश्चिम आशियाई देशांची जागा आता रशियाने घेतली आहे. नोव्हेंबरमध्ये रशिया हा भारताचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार देश होता. हा सलग दुसरा महिना ज्यात रशियाने आपल्याला कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठा केला आहे.

व्होर्टेक्साच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. एनर्जी कार्गो ट्रॅकर फर्म व्होर्टेक्साने यासंबंधीचा खुलासा केला आहे. एनर्जी कार्गो ट्रॅकिंग कंपनी व्होर्टेक्साच्या मते, रशियाने भारताला आत्तापर्यंत सर्वात मोठा क्रूड ऑईलचा पुरवठा केला असून रशियाने भारताचे पारंपारिक पुरवठादार असलेल्या इराक आणि सौदी अरेबियाला मागे टाकलं आहे.

या वर्षी 31 मार्च रोजी संपलेल्या चालू आर्थिक वर्षात भारताच्या एकूण तेल आयातीत रशियाचा वाटा फक्त 0.2 टक्के होता. नोव्हेंबरपर्यंत तो 20 टक्क्यांपेक्षा जास्त झाला. मागच्या महिन्यात भारताला दररोज 9,09,403 बॅरल (BPD) कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यात आला.

रशियानंतर इराक, सौदी अरेबिया, अमेरिकेचा नंबर

व्होर्टेक्साने दिलेल्या आकडेवारीनुसार, रशियानंतर इराक आणि सौदी अरेबिया भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करणारे दुसरे मोठे देश आहेत. नोव्हेंबरमध्ये इराकने भारताला दररोज 8,61,461 बॅरल आणि सौदी अरेबियाने 5,70,922 बॅरल तेलाचा पुरवठा केला होता.

यानंतर अमेरिकेचा नंबर लागतो. गेल्या महिन्यात अमेरिकेने भारताला दररोज 4,05, 525 बॅरल कच्च्या तेलाची निर्यात केली होती. नोव्हेंबरमध्ये रशियाकडून भारताला झालेली आयात ऑक्टोबरच्या तुलनेत कमी होती. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पाश्चात्य देशांनी त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले. तेव्हापासून भारताने रशियन क्रूड ऑईलची खरेदी सुरू केली आहे.

रशिया - युक्रेन रशिया युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाकडून आयात वाढली

व्होर्टेक्साच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 मध्ये भारताने रशियाकडून दररोज 36,255 बॅरल कच्च्या तेलाची आयात केली होती. याकाळात इराकमधून दररोज 10.5 लाख बॅरल आणि सौदी अरेबियातून 9,52,625 बॅरल प्रतिदिन आयात करण्यात आली होती.

त्यानंतर पुढच्या दोन महिन्यात रशियाकडून कोणतीही आयात झाली नव्हती. फेब्रुवारीच्या उत्तरार्धात युक्रेन युद्ध सुरू झालं आणि त्यानंतर मार्चमध्ये रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी पुन्हा सुरू झाली. मार्च 2022 मध्ये भारताने रशियाकडून 68,600 बॅरल कच्च्या तेलाची आयात केली होती.

त्यानंतर पुढच्या महिन्यात 2,66, 617 बॅरल कच्च्या तेलाची आयात झाली. जूनमध्ये यात वाढ होऊन 9,42,694 बॅरल आयात करण्यात आली. पण जूनमध्ये, इराक हा भारताचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा देश होता. भारताने प्रतिदिन 10.4 लाख बॅरल आयात केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT