cycle polo Nida Fatima 
महाराष्ट्र बातम्या

सायकलपोलो स्पर्धेसाठी नागपुरात आलेल्या मुलीचा मृत्यू; डॉक्टरांनी इंजेक्शन देताच...

सकाळ डिजिटल टीम

नागपूर: उपराजधानीत आजपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय सायकलपोलो स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या केरळच्या १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. निदा फातिमा असे मृत खेळाडूचे नाव आहे.

पोलिस व स्पर्धेचे आयोजक गजानन बुरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळचा मुलींचा संघ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बुधवारी सायंकाळी नागपुरात दाखल झाला होता. खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था धंतोलीमधील भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात करण्यात आली होती. निदाच्या पोटात दुखत असल्यामुळे तिला सकाळी आठच्या सुमारास धंतोली येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.

स्पर्धेसाठी आलेल्या १० वर्षीय मुलीचा मृत्यू

उपचारादरम्यान इंजेक्शन दिल्यानंतर तब्येत आणखी बिघडून साडेदहा वाजता तिचा मृत्यू झाला. निदाला दोन दिवसांपासून ‘मोशन’ होत नव्हती. त्यामुळे टॅब्लेट दिल्यानंतर तिच्या पोटात दुखू लागले होते. दरम्यान, निधाचे शव पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आले आहे.

आई-वडील आल्यानंतर होणार पोस्टमार्टेम

निदाचे आई-वडील केरळवरून नागपूरकडे निघाले असून, ते आल्यानंतर शुक्रवारी पोस्टमार्टेम होणार आहे. शवचिकित्सा अहवालातून निदाच्या मृत्यूचे खरे कारण पुढे येणार आहे. या खळबळजनक घटनेमुळे केरळ संघाचे प्रशिक्षक व व्यवस्थापकासह तिच्या सहकारी खेळाडूही प्रचंड हादरल्या आहेत. धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? कच्चा तेलाच्या किंमती १०० डॉलरच्या पार...

Pune News : दहीहंडीत नियमांचे उल्लंघन; आणखी नऊ गुन्हे दाखल; मंडळाच्या १६ पदाधिकाऱ्यांचा समावेश

Tata Punch: 'टाटा पंच' गाडीचा नवा विक्रम! 'या' कारला टाकलं मागे, देशात पहिल्या क्रमांकाची पसंती; काय आहे खास?

Marathwada Irrigation Demand: खरीप पिकांना जीवदानासाठी सिद्धेश्वर, येलदरी धरणातून तातडीने पाणी सोडा; आमदार राजू नवघरे यांची जलसंपदा मंत्र्याकडे मागणी

Dancer Aishwarya Jadhav : अश्लील नृत्याला परवानगी देऊ नका; मात्र कलेचा आदर करणाऱ्यांना परवानगी द्या

SCROLL FOR NEXT