cyrus mistry Death in car accident deputy chief minister fadnavis ordered an inquiry  
महाराष्ट्र बातम्या

Cyrus Mistry Death : कार अपघाताची चौकशी होणार, फडणवीसांनी दिले आदेश

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पालघर येथे झालेल्या रस्ता अपघातात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कार डिव्हायडरवर आदळल्याने झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान याप्रकरणाची अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. 'प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्व होते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्तस्वकियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति ! पालघरनजिक झालेल्या या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली असून राज्याच्या पोलिस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे.'

सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे यांनी मिस्त्री यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून, सायरस मिस्त्री यांचे अकाली निधन धक्कादायक आहे. भारताच्या आर्थिक क्षमतेवर विश्वास ठेवणारे ते एक आश्वासक उद्योगपती होते. त्यांच्या जाण्याने वाणिज्य आणि उद्योग जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax law : १ एप्रिल २०२६ पासून मोदी सरकार तुमच्या फोनमधील मेसेज चेक करणार? नव्या Income Tax कायद्यामागचं सत्य काय?

Latest Marathi News Live Update : वाहन चालकाला डुलकी लागल्याने समृद्धी महामार्गावर अपघात, महिला जखमी

Leopard: शिकार केलेल्या ठिकाणी बिबट्या पुन्हा-पुन्हा का येतो? माणसाने कोणती काळजी घेतली पाहिजे?

Shashikant Shinde : पक्षाचे हित महत्त्वाचे; सन्मानजनक प्रस्तावासह दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर निर्णय होईल- शशिकांत शिंदे!

Pune Police Rescue : बाणेरमधील लॉजवर पोलिसांची धडक; महिलांची सुटका; व्यवस्थापकासह चार आरोपी अटकेत!

SCROLL FOR NEXT