Dada Bhuse Sakal
महाराष्ट्र बातम्या

दादा भुसेंच्या मुलामुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार? पोस्टरमुळे अस्वस्थतेची शक्यता

दादा भुसेंनी मात्र हे प्रकरण सावरुन घेण्याचा प्रयत्न केला आहेत.

सकाळ डिजिटल टीम

लोकसभा तसंच महानगरपालिकेच्या निवडणुकाही आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यामध्ये आता शिंदे गटाची भर पडली असून त्यामुळेच स्थानिक पातळीवर भाजपाची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. काय आहे याचं कारण?

नाशिकचे पालकमंत्री, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांचे धुळ्यात पोस्टर्स लागले आहेत. हे पोस्टर्स चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे आविष्कार भुसेंना या पोस्टरमध्ये भावी खासदार असं संबोधण्यात आलं आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात त्यांचा वाढदिवस होऊनही हे पोस्टर्स अजूनही हटवण्यात आलेले नाहीत.

हेही वाचा - Will India Become ‘Sextortion’ Capital Of The World?: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

त्यामुळे आता भाजपा आणि शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आविष्कार भुसे यांनी धुळ्यात गेल्या वर्षभरात युवा संघटनासाठी काम केलं आहे. त्यामुळे आता ते निवडणुकीच्या शर्यतीत असतील, अशा चर्चा या निमित्ताने रंगत आहेत. मात्र आपण हे फलक काढून टाकण्यास सांगितले असल्याचं दादा भुसे यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT