Gautami Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

Gautami Patil: इंदुरीकर महाराजांच्या आरोपावर गौतमी पाटीलची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाली, महाराजांचा…

गाण्यासाठी 3 लाख घेतेइंदुरीकर महाराजांचे गौतमी पाटीलवर आरोप

अंकिता खाणे (Ankita Khane)

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर इं दुरीकर महाराज यांनी काही दिवसांपूर्वी टीका केली होती. गौतमी पाटील तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये घेते. आम्ही फक्त 5 हजार रुपये वाढवून मागितले तर बाजार मांडल्याचा आरोप आमच्यावर होतो. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा होतो. मुलांचे ढोपर फुटतात. पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागतो. गौतमीला संरक्षण दिलं जातं. आम्हाला संरक्षण नसतं, अशी टीका इंदुरीकर महाराज यांनी केली होती.

इंदुरीकर महाराजांच्या या टीकेवर गौतमी पाटीलने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, सोशल मीडियातून इंदुरीकर महाराज यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. त्यांच्याविरोधातील मिम्सही व्हायरल झाले होते. मात्र गौतमीने पहिल्यांदाच इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.

गौतमी पाटील बोलताना म्हणाली कि, ते महाराज आहेत. मी त्यांच्याविषयी काय बोलणार. फक्त गैरसमज नका करू. इंदुरीकर महाराजांचा गैरसमज झाला आहे. ते सांगतात तेवढं माझ मानधन नाही. हे प्रेक्षकांनी ही ध्यानात घ्यावं. मी तिन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केले नसते.

पुढे ती म्हणाली कि, आमच्या टीममध्ये 11 मुली आहेत. आमची एकूण 20 जणांची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नाही. आणि तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये कोणीही देणार नाही, असं गौतमी पाटील म्हणाली आहे.

इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर तृप्ती देसाईंची संतप्त प्रतिक्रिया

गौतमी पाटीलला दिलेल्या मानधनामुळे तुमच्या पोटात का दुखतयं? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी कीर्तनकार इंदुरीकर यांना केला आहे. महिला आपल्यापुढे गेलेली बघवत नाही म्हणूनच इंदुरीकरांनी गौतमी पाटीलवर टीका केल्याचं मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलं. इंदुरीकर तुमचा ब्लॅकचा पैसा कुठे जातो, असा सवाल देसाई यांनी इंदुरीकरांना केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT