Shivaji Park Sakal
महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava: कुणाच्या मेळाव्यात गर्दी जास्त? वाचा सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर इतिहासात पहिल्यांदाच काल शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात कुणाच्या सभेसाठी गर्दी जमा होते त्यासंदर्भात चढाओढ होती.

(Shivsena Dasara Melava Latest Updates)

शिवाजी पार्कवर एक लाख लोकांची गर्दी जमली असल्याचा दावा काहीजणांकडून करण्यात आला आहे तर बीकेसी मैदानावर दोन लाखांची गर्दी जमा झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण शिवाजी पार्कची क्षमता ५५ ते ६० हजार लोकांची असून पोलिसांच्या अंदाजानुसार काही लोकं मैदानात तर काहीजण मैदानाच्या बाहेर थांबलेले होते. त्यामुळे शिवाजी पार्कवर ६५ हजारांच्या आसपास लोकं असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळावा पार पडला. या मैदानाची क्षमताही दीड लाखाच्या आसपास असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या सभेला ९० हजार ते १ लाखांच्या आसपास लोकं जमा झाले असावेत असा प्राथमिक अंदाज असल्याचं सांगितलं आहे.

तर मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की, शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला अडीच लाख लोकं आले होते. तर शिंदे यांच्या मेळाव्याला अडीच ते तीन लाख लोकं आले असल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT