Uddhav Thackeray And Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava! गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाकडून थेट उद्धव ठाकरेंच्याच आवाजाचा वापर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - महाराष्ट्राचं राजकारण मागील काही दिवसांपासून दसरा मेळाव्याभोवती फिरत आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचा वाद उच्च न्यायालयात गेला होता. अखेर शिंदे गटाने दसरा मेळावा बीकेसीवर घेण्याचं नाईलाजाने मान्य केलं. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी दोन मेळावे होणार असून उद्धव ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. या मेळाव्यांना गर्दी जमविण्यासाठी दोन्ही गट प्रयत्न करत असून एकमेकांवर हल्लाबोल करत आहे.

सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटांमध्ये दसरा मेळाव्याचा टीझर प्रसिद्ध करण्याची चढाओढ लागली आहे. शिवसेनेकडून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची झलक प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये बाळासाहेब म्हणतात. की एकाही आमदाराने बंडखोरी केली तर त्याला कायद्याची चिंता न करता तिथेच तुडवा. या टीझरच्या माध्यमातून शिवसेनेने बंडखोरांवर हल्लाबोल केला.

दरम्यान शिंदे गटाने आपल्या टीझरमध्ये थेट उद्धव ठाकरेंचा आवाजच वापरला आहे. वास्तविक पाहता, गर्दी जमवण्यासाठी टीझर शेअर केला जातो. मात्र शिंदे गटाने गर्दी जमवण्यासाठी थेट उद्धव ठाकरेंच्या आवाजाचाच आधार घेतल्याचं दिसतं.

शिंदे गटाच्या टीझरमध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना दिसतात. त्यावर विसर न व्हावं, अशी टॅग लाईन देण्यात आली आहे. अर्थात हा उद्धव ठाकरेंना टोला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

नवरा-मुलीचा मृत्यू, समाजाचे टोमणे अन् डोळ्याला दुखापत; तरीही RAS मध्ये मिळवलं मोठं यश.... रोहिणी गुर्जर यांची जिद्दीची कहाणी

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

Maharashtra Water Crisis: राज्यात पाणीकपात लागू! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात; जाणून घ्या सरकारचे नवे नियम

आजचे राशिभविष्य - 06 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT