dasara melava Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

शिंदे गटाला मेळाव्याआधीच धक्का! मुंबईत कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट प्रथमच थेट आमने-सामने येणार आहेत. मुंबई दोन्ही गटाचे कार्यकर्ते दाखल झाले आहेत. त्यामुळे या मेळाव्यांची सर्वांना उत्सकता लागली असताना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.

यवतमाळ येथून शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. श्रीकृष्ण मांजरे असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. यवतमाळ ते मुंबई या प्रवासादरम्यान कार्यकर्त्याचं निधन झालं आहे.

बहुप्रतीक्षित असलेला राज्यातील शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा आज संध्याकाळी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर, आता यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव काय बोलणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाचाही दसरा मेळावा बीकेसी येथे पार पडणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी शिंदे गटाकडून केलीय. या मेळाव्याला राज्यभरातून 3 लाख लोक उपस्थित राहतील असा दावा करण्यात आलाय. यासाठी बस ट्रेन बूक करण्यात आल्या आहेत. त्यांच्यासाठी जेवण आणि इतर सोई यांच नियोजन करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT