Maharashtra Dasara Melava Esakal
महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava Rally: प्रचार तोफांची आज पहिली सलामी; जाणून घ्या कोणत्या नेत्याचा कुठं होणार दसरा मेळावा

Dasara Melava Sabha: श्रीक्षेत्र नारायणगडावर महंत शिवाजी महाराज व मनोज जरांगे पाटील हे हेलिकॉप्टरने येतील. या मेळाव्यांच्या भूमीवर पोलिस दल सतर्क झाले आहेत.

आशुतोष मसगौंडे

विधानसभा निवडणुकीची तारीख येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात उद्या (ता. १२) राजकीय दसरा मेळाव्याच्या निमित्ताने प्रचाराचे नारळ फुटणार आहेत.

मुंबईत ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगणार असून मराठवाड्यात मनोज जरांगे- पाटील (नारायणगड) आणि पंकजा आणि धनंजय मुंडे (भगवान भक्तीगड) यांच्या तोफाही धडाडतील.

मध्यंतरी आरक्षणाच्या मुद्यावरून जरांगे यांनी थेट मुंडे बंधू- भगिनींवर निशाणा साधला होता, त्यामुळे आता ते नेमकी काय भूमिका मांडतात ? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

दसऱ्याच्याच मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्याच 'पॉडकास्ट'च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार असल्याने यंदाचा दसरा विधानसभा निवडणुकीच्या वाऱ्याची दिशा निश्चित करणारा ठरणार आहे.

सत्ताधारी भाजपला हरियाना विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने महायुतीला स्फुरण चढले आहे तर लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने मैदान मारल्याने त्यांचा आत्मविश्वासही दुणावला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर बीकेसी मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. मराठवाड्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे या भावाबहिणींचा एकत्रित मेळावा पहिल्यांदा होत आहे.

टिझरमधून वातावरण निर्मिती

या दसरा मेळाव्यांवरून मागील दोन दिवसांपासून टिझरच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जात आहे.

शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने प्रसिद्ध केलेल्या 'टिझर'मध्ये 'महाराष्ट्राचा एकमेव पारंपरिक दसरा मेळावा असल्याचा दावा करण्यात आला असून शिवसेनेकडून पुन्हा हिंदुत्वाची साद घालण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत जाऊन शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधले होते. धनुष्यबाणाच्या साहाय्याने मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेची सुटका केल्याची कार्टून चित्रफीत तयार करण्यात आली आहे.

पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात प्रथमच धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्तिगडावरील मेळाव्याचे हे दहावे वर्ष आहे. यंदाच्या मेळाव्याला त्यांचे बंधू पालकमंत्री धनंजय मुंडे प्रथमच येत आहेत. या मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून व्यासपीठ व हेलिपॅडची उभारणी करण्यात आली आहे.

नारायणगडावर एक दिवस आधीच भाविक

बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नारायणगडावर शुक्रवार (ता. ११) पासूनच भाविक मुक्कामी पोचले असून काही भाविक शहरात व्यवस्था केलेल्या मंगल कार्यालयांत वास्तव्यास आहेत.

श्रीक्षेत्र नारायणगडावर महंत शिवाजी महाराज व मनोज जरांगे पाटील हे हेलिकॉप्टरने येतील. या मेळाव्यांच्या भूमीवर पोलिस दल सतर्क झाले आहेत. सुमारे दोन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आत आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT