Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava : 'कळसुत्री' म्हणत देवेंद्र फडणवीसांवर ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हटलं...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बहुचर्चित उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. अंधारे यांनी चौफेर टीका करत शिंदे गटाला फटकारलं. यावेळी अंधारे यांनी भाजपनेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला. (Dasara Melava news in Marathi)

सुषमा अंधारे म्हणाले की, आम्ही काय काखेत रेडिओ ठेवतो, की धोतरावर ईन करतो. काहीही सांगता. म्हणे आम्ही हिंदूत्व सोडलं....नुपूर शर्मासारखी चिल्लर आणि थिल्लर भाषा आम्ही वापरत नाही. कळसुत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अंतकरणावर हात ठेवावा आणि सांगावं....हिंदू धर्मातील असा कोणता ग्रंथ, वेद, श्रृती आहे की ज्यामध्ये दुसऱ्या धर्माचा द्वेष करावा लागतो, दरवेळी आपल्या धर्माचे महत्व सांगण्यासाठी दुसऱ्या धर्माचा द्वेष का करावा लागतो. तुम्ही सर्वमान्य हिंदूत्वाची संकल्पना मानत नाही. तुम्ही हिंदूत्वाला कलंक लावला, अशी टीकाही अंधारे यांनी फडवणीसांवर केली.

शिवसेना विचार आहे. ती संपणारी नाही. शिवसेनेची पाळंमुळं खोलवर आहे. एक दीपक केसकर आपण फारच संयमानं बोलता आहात. तुम्ही मुंबई ते गोव्याचा हिशोब देणार होतात तो द्या.... संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात तुम्ही मेहंदीवाल्याची, ब्युटी पार्लरची चौकशी केली होती. ते दहा कोटी रुपये कुठून आले, असा, सवालही अंधारे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Katraj News : भारती विद्यापीठ भागात हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भडका; चारजण जखमी

SCROLL FOR NEXT