Dasara Melava esakal
महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava: शिंदे गटाकडून सेनेची मैदानकोंडी; मुंबईतील मोक्याच्या ठिकाणावर नजर

दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आणि शिंदे गटामध्ये राजकारण पेटू लागलं आहे.

धनश्री ओतारी

दसरा मेळावा जसजसा जवळ येत आहे तस तस राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आणि शिंदे गटामध्ये राजकारण पेटू लागलं आहे. मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची रस्सीखेच सुरू असतानाच शिंदे गटाने प्लॅन बी सुद्धा तयार ठेवला आहे. (Dasara Melava shivsena Eknath Shinde clan comes up with plan at MMRDA ground)

शिवाजी पार्कवर दरवर्षी होणारा दसरा मेळावा घेण्याचा हक्क आपला आहे, असे सांगत शिंदे गटाने ठाकरे यांच्यासमोर शड्डू ठोकला आहे. केंद्र आणि राज्यात असलेली भाजपची सत्ता पाहता मुंबई महानगरपालिकेकडून दसरा मेळावा घेण्याचा हक्का शिंदे गटाच्या पारड्यात टाकला जाऊ शकतो. तसे झाल्यास शिवसेनेती अनेक दशकांची दसरा मेळाव्याची परंपरा खंडित होऊ शकते.

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य हे शिवाजी पार्कबाबत मुंबई महापालिकेचं धोरण आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर आधी अर्ज करणाऱ्या ठाकरे गटाला प्राधान्य मिळू शकतं. परिणामी शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी एमएमआरडीए मैदानाचा पर्याय तयार ठेवत त्यासाठी अर्जही केल्याची माहिती आहे.

मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाने मेळाव्यासाठीचा अर्ज केला आहे. हे ठिकाण म्हणजे बीकेसी येथे असणारं एमएमआरडीए मैदान.

शिंदे गटाकडून सेनेची मैदानकोंडी

ठाकरे गटाला मैदान मिळू नये म्हणून शिंदे गटाने मोठी मोठी मैदानं बुक केलं होतं. परेळ येथील नरे पार्क, सायनमधील सौमय्या मैदान, गोरेगावमधील नेस्को आणि अंधेरी स्पोर्टस कॉम्पेक्स अशी अनेक मोठी मैदान बुक करण्यात आली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT