date declare of CET examination  
महाराष्ट्र बातम्या

सीईटीच्या तारखा जाहीर; मार्च ते ऑगस्ट दरम्यान परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) 2020-21 शैक्षणीक वर्षातील विविध अभ्यासक्रमांच्या घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, वैद्यकीय आणि ललील कला आर्ट या अभ्यासक्रमांच्या 18 परीक्षांचा समावेश आहे.

तंत्रशिक्षण विभागात अभियांत्रीकी/ तंत्रज्ञान (बीई/बीटेक), औषधनिर्माण, कृषी संबंधीत अभ्यासक्रम, दुग्धशाळा तंत्रज्ञान, मास्यविज्ञान या पदवी अभ्यासक्रमांची परीक्षा 13 एप्रिल ते 17 एप्रिल आणि 20 एप्रिल ते 23 एप्रिल 2020 या कालावधीत होणार आहे. "एमबीए' आणि "एमएमएस' पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 14 आणि 15 मार्च 2020, मास्टर इन कॉम्पीटर अप्लीकेशन (एमसीए) 28 मार्च, मास्ट इन अर्कीटेक्‍टर 10 मे, हॉटेल मॅनेजमेंट (पदवी) 10 मे, हॉटेल मॅनेजमेंटची (पदव्युत्तर) प्रवेश परीक्षा 16 मे रोजी होणार आहे.

उच्च शिक्षण विभागातअंतर्गत एलएलबी (पदवी - 5 वर्ष) प्रवेश परीक्षा 12 एप्रिल, एलएलबी (पदवी 3 वर्ष) 28 जून, शारिरीक शिक्षण (बी.पी.एड पदवी) 11 मे आणि मैदानावरील चाचणी 12 मे आणि 13 मे, बीएड आणि एमएड (इनटीग्रेटेड 3 वर्ष) 12 मे, शारिरीक शिक्षण (एमएड पदव्युत्तर) 14 मे आणि मैदानावरील चाचणी 15 आणि 16 मे, बीए/बीएससी बीएड (इनटीग्रटेड 4 वर्ष) 20 मे, मास्टर इन एज्युकेशन (एमएड) 26 मे, बॅचलर ऑफ एज्युकेशन (जनरल अँड स्पेशल) 13 जून आणि 14 जून.

वैद्यकीय शिक्षण मध्ये मास्टर ऑफ फिजीओथेरपी, ऑक्‍युपेशनल थेरपी, ऑडीओ स्पीच लॅंगवेज पॉथोलॉजी, प्रोस्थेटीक्‍स अँड ऑथ्रोटीक्‍स जुलै-ऑगस्ट 2020. ललील कला (फाईन आर्ट) पदवी अभ्यासक्रमासाठी 10 मे (प्रॅक्‍टीकल) आणि 11 मे रोजी (ऑनलाईन) परीक्षा होणार आहे.
"सीईटी' सेलतर्फे या प्रवेश परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आणि परीक्षेसंदर्भातील सूचना, माहिती पुस्तीका, प्रवेश अर्ज, प्रवेश नियम, शासन निर्णय ही माहिती www.mahacet.org या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे आयुक्त संदीप कदम यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT