medical exam esakal
महाराष्ट्र बातम्या

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्‍या परीक्षांची तारीख ठरली! मंत्री अमित देशमुख यांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या (medical examination) परीक्षांसंदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत बुधवारी (ता.१९) मुंबईला मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी घोषणा केली आहे. (date-of-medical-examination-fixed)

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्‍या परीक्षा आता १० जूनपासून

विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या हिवाळी सत्र २०२० च्‍या लेखी परीक्षा आता १० जूनपासून घेतल्‍या जाणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी घोषणा केली आहे. ३० जूनपर्यंत विविध अभ्यासक्रमांच्‍या परीक्षा पार पडतील. महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या विविध शिक्षणक्रमांच्‍या हिवाळी सत्र २०२० च्‍या परीक्षा २ जूनपासून नियोजित होत्‍या. परंतु कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्‍यभरात लागू निर्बंधांना ३१ मार्चपर्यंत दिलेल्‍या मुदतवाढीमुळे परीक्षा वेळापत्रकाचे फेरनियोजन करण्याच्‍या सूचना मंत्री देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी विद्यापीठ यंत्रणेला दिल्‍या होत्‍या. त्‍यानुसार राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता १० ते ३० जून या कालावधीत घेतल्‍या जाणार आहेत.

या परीक्षांचा आहे समावेश..

या परीक्षांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयुएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे. या वैद्यकीय पदवी परीक्षांसोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT