rajesh tope sakal
महाराष्ट्र बातम्या

पुढे ढकललेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

'या' दिवशी होणार परीक्षा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : परीक्षेच्या एक दिवस आधी पुढे ढकलण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या गट 'क' आणि गट 'ड' च्या परीक्षांची नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, गट क ची परीक्षा २४ ऑक्टोबर रोजी तर गट डची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या परीक्षांच्या नऊ दिवस आधी उमेदवारांना हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. परीक्षांसदर्भात आज पार पडलेल्या बैठकीत आरोग्य मंत्र्यांनी याची घोषणा केली. या परीक्षा अचानक रद्द झाल्यानं उमेदवारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.

आरोग्य मंत्री म्हणाले, जाहीर करण्यात आलेल्या नव्या तारखा या रविवारी असल्याने या दिवशी परीक्षा केंद्रांसाठी शाळा उपलब्ध होऊ शकतील. या परिक्षांच्या तयारीसाठी डॅशबोर्ड देण्याची तसेच केंद्रांची माहिती १ ऑक्टोबरपर्यंत द्यावी अशी मागणीही यावेळी बैठकीत करण्यात आली. त्याचबरोबर उमेदवारांना परीक्षेच्या नऊ दिवस आधी हॉलतिकीट ऑनलाईन उपलब्ध होतील अशी माहितीही यावेळी टोपे यांनी दिली.

अफवांवर विश्वास ठेऊ नका - टोपे

आरोग्य विभागाची मोठी भरती असल्यानं त्याबाबत वावड्या उठवल्या गेल्या आहेत. मात्र, या अफवांकडे लक्ष देऊ नका. या भरती प्रक्रियेत गैर मार्गाचा वापर झाल्याचं निदर्शनास आलं असेल तर उमेदवारांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवावी. परीक्षा परदर्शक व्हाव्यात यासाठी तक्रार नोंदवणं आवश्यक आहे, असं आवाहनंही यावेळी बैठकीदरम्यान राजेश टोपे यांनी केलं.

उमेदवारांना करावा लागला अडचणींचा सामना

यापूर्वी २५ आणि २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या क आणि ड गटाच्या परीक्षा चार दिवसांवर आलेल्या असतानाही अभ्यासक्रमाची उमेदवारांना कल्पना नव्हती. अनेकांचे प्रवेशपत्र मिळालेलं नव्हतं. अनेकांच्या प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ उपलब्ध नव्हती. दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणे अशक्य होते. संकेतस्थळ अनेकदा हँग होतं होतं.

आरोग्य विभागातील पदे

१) गट क : रासायनिक सहायक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ, आहार तज्ज्ञ, अधिपरीचारिका, वरिष्ठ तंत्रज्ञ, सुतार, वाहन चालक

२) गट ड : शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, प्रयोगशाळा सेवक, रक्तपेढी परिचर, दंतसहाय्यक, पुरुष/स्त्री परिचर, अकुशल कारागीर, मदतनीस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge: नवले पुलावरील अपघातांना बसणार आळा! लवकरच सुरू होणार नवा पर्यायी मार्ग; प्रवाशांना मोठा दिलासा

New Frog Species: नागालँडमध्ये बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध; पुण्यातील भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या शास्त्रज्ञांचा संशोधनात सहभाग

Petrol-Diesel-CNG Price: CNG महागल्यानंतर आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Team India Matches Today: वैभव सूर्यवंशी, रोहित शर्मा अन् स्मृती मानधना एकाच दिवशी मैदानात! केव्हा, कुठे रंगणार आज सामने; एका क्लिकवर वाचा

Suresh Borse Death Case : शिक्षक मृत्यू प्रकरणी PSIसह अंमलदार निलंबित; अटकेची प्रक्रिया सुरू; संशयितांना वाचवण्याचा होता प्रयत्न

SCROLL FOR NEXT