Parth Pawar Y+ Security Esakal
महाराष्ट्र बातम्या

Parth Pawar Y+ Security: निवडणुकीच्या धामधुमीत पार्थ पवारांना थेट वाय प्लस कॅटेगरीची सिक्युरिटी, कारणांची चर्चा

Parth Pawar Y+ Security: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Parth Pawar Y+ Security: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारसभा घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते मतदारसंघातील नागरिकांसोबत ते संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, राज्यामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि यातच राज्यातील पोलीस दलामध्ये मनुष्यबळ कमी पडत असताना उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवावर राज्य सरकार मेहरबान झाले आहे का अशा चर्चांना उधाण आलं आहे.

पुणे पोलीस आयुक्तांनी निवडणूकीच्या काळात महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढली आहे, असे असताना, राज्य शासनानेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चिरंजीवांना वाय प्लस सुरक्षा दिल्याने चर्चा सुरू झाली आहे.

पार्थ पवार हे अजित पवारांचे चिरंजीव असून गेल्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती.

तर याआधी खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसापुर्वी पत्र लिहून युगेंद्र पवार आणि रोहित पवाराना सुरक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, पार्थ पवारांना थेट वाय प्लस कॅटेगरीची सिक्युरिटी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. याबाबतचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant संतापले! २००९चा खटला अजूनही अडकलेला... देशभरातील न्यायव्यवस्थेला दिला आदेश, पुढे काय होणार?

Marathi Breaking News LIVE: आंदेकर टोळीचे स्टेटस ठेवणाऱ्या युवकावर MPDA कारवाई

Pune–Kolhapur Highway : पुणे-कोल्हापूर महामार्ग वर्षभरात पूर्ण होणार, नितीन गडकरी यांनी दिला शब्द; रिलायन्सचे काम काढून घेतल्याचीही माहिती

जुई गडकरी की तेजश्री प्रधान! संपत्तीमध्ये कोण आघाडीवर? नेट वर्थच्या रेसमध्ये सायली की, स्वानंदी, कोण आहे पुढे?

Karad Crime: 'चाेरीप्रकरणी शिक्षकासह दाेघांना अटक'; ढवळेश्वर येथून १६ ताेळे हस्तगत

SCROLL FOR NEXT