mp navneet rana  sakal
महाराष्ट्र बातम्या

Navneet Rana Threaten Call: खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून चौकशी सुरू

धमकी प्रकरणी तक्रार दाखल करुन पोलीसांनी तपास सुरू केला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये नेत्यांना धमकीचे फोन येण्याच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यावेळी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचे फोन येत असल्यामुळे नवनीत राणा यांनी तातडीने पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार देण्यात आली आहे. तसेच धमकी प्रकरणी तक्रार दाखल करुन सदर व्यक्तीचा तातडीने शोध घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

आपल्या तक्रारीत नवनीत राणा यांनी म्हटलंय की, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून 088055 41949 संपर्क क्रमांकावरून विठ्ठल राव नामक व्यक्तीचा मला कॉल येत होता. या व्यक्तीने मी तिवसामधून बोलतो आहे असं सांगितलं. त्याचबरोबर त्याने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

'तु गर्दीच्या ठिकाणी जाते ना त्या ठिकाणी मी कधीही धारधर चाकुने वार करणार ते तुला माहितीही पडणार नाही'. त्याचबरोबर फोनवर अश्लील शिवीगाळ करुन खालच्या भाषेचा वापर केला, असंही नवनीत राणांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

अशा माथेफिरूला त्वरित जेरबंद करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी करावी. त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी तक्रार खासदार नवनीत राणा यांच्याकडून त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. राजापेठ पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT